शिवचरित्र - लेख १५
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[आरंभी बराच फार्शी मजकूर] श. १५२० पौष व. ११
इ. १५९९ जाने. १२
ई कौलूनामे अजदीवाण मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल त॥ तिमाजी नागोजी देसाई व कुलकरणी म॥ मज॥ सु॥ तिसा तिसैन मया कौलुनामा दादे बसाजे तुझे बाबे देसक मामले मज॥ मालुम केले जे नफर मजकुराचा मकसूद प्रमाणे कौलु सादीर करणे मालुम जाले बराबे मालुमाती खातीरेस आणुनु कौलनामा सादरि केला असे
आपली मोहोतादी कसबे मजकुरावरी सालाबाद आहे दरीवरुन कुले देता हरकत कैफयेत करिताती तरि ये बाबे हुजुरुनु इक मर्हामती फर्माउनु आपली मोहोतादी सालाबाद आहे ते ताकीद करुनु देवणे म्हणौनु मालुम केले तरिब॥ सालाबाद मोहोतादी आहे ते ताकीद करुनु देउनु आपणास अदिकार तपे आठागत आहे त्यावरी दिवाणची किताबती आहे ते किताबतीचा जागा तपे मजकुरी विर्ती आहे ते हाली खराब पडिली आहे किताबती आपणास देणे पडते पेसजी रोजमुरदाराची वरात करुनु झाडा करवीत हाली तहसील वराता करिताती सगीन देणे होते तरी किताबतीची वरात रोजमुरदाराची करणे तहसिली वरात रोजमुरदाराची करणे तहसिली वराता न करणे म्हणौनु मालुम केले तरि किताबतीवरी वराता रोजमुरदाराच्या करुनु तहसील वराता न करु.
आपली मिरासी खारी चिखली निमे मीर आकिलासी आपण करोख्त केली यावरी रखुमीण बहु आपाजी देसाई तिसी निसबती नसता तिने खारीचे भात नेले याबदल मीर मसारुनुइलेनी तकादा करुनु भाताचे पैके ळारि ३८ आपणापासुनु घेतळे ये बाबे खोज हैदर ठाणदार देवनु तरि सदरहु पैके रखुमिणीपासुनु आपणास देववणे म्हणौनु मालुम केले तरी रखुमिणीस ताकीद करउनु पैके देवउनु
येण्हे कौले बेसक होउनु दिवाण कामगारी कीजे कोण्हे बाबे तालुक अंदेसा न कीजे
तेरीख २४ जमादिलाखर.
N/A
References : N/A
Last Updated : February 11, 2019
TOP