मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ७१

शिवचरित्र - लेख ७१

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.



[शिक्का व दोन ओळी नष्ट]
श.१६०९ कार्तिक शु.४
इ.१६८७ आक्टो.३०

सुहूर सन समान समानीन व अलफ दादे कौलनामा यैसाजे तुमचे बाबे देशमुख मामले मजकूर येऊन मालूम केले की सन सितामधे हबसी राजापूरकर गनीम येऊन शाहार जालहाल करुन गेले याकरिता रयेत कुल परागदा जाहाली शाहार दोनी वरसे खराब पडिले वसाहत नाही तरी साहेबी रयेतीवरी मेहरवानी करुन मकसूद मनास आणून मकसूदप्रमाणे कौल दिल्हा पाहिजे म्हणजे रयेती शाहारात जाऊन वसाहत करील म्हणून अर्ज केला बराये अर्ज खातीरेस आणून मकसूद मनास आणून कलमाचे कलम कौल दिल्हा असे बी॥
किता कलम गनिमाने शाहार मारिले त्या तागाईत शाहारात फिरोन गेलो नाही खराब पडिले उदीम राहिला साहेबी मामुरीवर नजर देऊन वसाहतीची रजा फर्माविली कबूल आहो साहेबी घरटका मीठटका व बाजे बाबती व महसूल माफ केला पाहिजे म्हणून तरी मीठटका घेऊन वरकड येक साला माफ केले असे जाणिजे मोर्तब सुद कोटवाडा खाजगीमधे येकदोघ सोनार धरुन नेऊन तकदमा पैके घेतले आहेती साहेबी मेहरवान होऊन पैके देविले पाहिजती म्हणून तरी जाले ते जाले याउपरि तसवीस लागो देण्हार नाही चिंता न करणे मोर्तब सूद शाहारामधे दिवाण लोक कामे करविताती त्याची मशाखत देत नाही मेहरवान होऊन देवीत गेले पाहिजे म्हणून तरी शाहारामधे जे कामे करवितील मजुरी नेदीत त्यास ताकीद करुन मशाखत देवऊन जाणिजे मोर्तब सुद आमचे दारी येक येक दोन माड आहेती तरी साहेबी बदल मामुरी देणे माफ केले पाहिजे म्हणून तरी येक साला देणे माफ केले असे जाणिजे मोर्तब सुद
वेटबेगार रायेगड व खादरी कुलाबा सागरगड पदमदुर्ग हे आमच्याने करवत नाही जें काम सागणे ते शाहारात कबूल असो म्हणोन तरी शाहाराखेरीज दुसरे जागा तुम्हा को [न्हा] स पाठवणार नाही समजाद असो देणे जाणिजे मोर्तब सुद शाहारातील आम्ही सोनार मुलकात फिरावयास जातो भलताच किलेकरी व नामजाद लोकामधेच धरुन धासदपट करितो काही दाणादुणा रुका आडिका असतो तो घेऊन जातो मेहरवान होऊन माफ केले पाहिजे म्हणून तरी दरम्याने तसवीस लावील त्याचे ठावठिकाण हुजरेच ठाई पाडू मामलास येणे पारपत्य होईल जाणिजे मोर्तब सुद आम्ही शाहारात मामूर जालियाते आम्ही शाहारात जाऊन वरती करुन आमचा उदीम चाले ते माफीक खडणी केली पाहिजे म्हणून तर बहुत बरे येण्हेचप्रमाणे चालऊन जाणिजे मोर्तब सुद.
येण्हेप्रमाणे कलमाचे कलम मनास आणून तुम्हास कौल सादर केला असे येण्हे कौले कवीहाल होऊन सुखे शाहारात येऊन घरे बाधोन वसाहाती करणे कोण्हे बाबे शक अंदेशा न धरणे येण्हेचप्रमाणे मकसुदाच्या तालिका करुन हुजूर राजश्री पंतस्वामीचे सेवेस बखैर लिहून सुभास लिहून तुम्हास कौल आणऊन बेसक होऊन शाहारात वसाहात करणे उदीम वेवसावे करणे दरीबाब कौल असे मोर्तब सुद
तेरीख ३ माहे मोहरम
माहे मोहरम
[प्रत्येक कलमाच्या व लेखाच्या अखेरीस ‘मोर । तब सु ।’ असा बदामी मो.]

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP