मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ५५

शिवचरित्र - लेख ५५

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श्रीशंकर
श.१५९८ भाद्र.शु.८
इ.१६७६ सप्टें.५

मशहुरल हजरत राजश्री रामाजी अनंत सुबेदार मामले प्रेभावेली प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत सुहुर सन सबा सबैन वलफ साहेब मेहरवान होऊन सुभात फर्माविला आहे येसियास चोरी न करावी इमाने इतबारे साहेबकाम करावे येसी तू क्रियाच केलीच आहेस तेणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणे या उपरि कमाविस कारभारास बरे दरतुरोज लावणी संचणी उगवणी जेसी जेसी जे जे वेलेस जे करु येते ते करीत जाणे हर भातेने साहेबाचा वतु .... होये ते करीत जाणे मुलकात बटाईचा तह चालत आहे परतु रयेतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहींत येसे बरे समजणे दुसरी गोष्टी की रयेतीपासून यैन जिनसाचे नक्ष घ्यावे येसा येकंदर हुकूम नाही सर्वथा येन जिनसाचे नख्त घेत घेत नव जाणे येन जिनसाचे येन जिनसच उसूळ घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेलचे वेलेस विकीत जाणे की ज्या ज्या हुनेरेन माहाग विकेल आणि फायेदा होये ते करीत जाणे उसूल हंगामसीर घ्यावा आणि साठवण करुन आणि विकरा येसा करावा की कोण्हे वेलेस कोण जिनसच विकावा ते हंगामी तो जिनस विकावा जिनस तरी पडेन जाया नव्हे आणि विकरा तरी माहाग यैसे हुनेरेने नारल खोबरे सुपारी मिरे विकीत जाणे महाग धारणे जरी दाहा बाजार यैन जिनस विकेल तर तो फायेदा जाहालियाचा मजरा तुझाच आहे येसे समजणे त्या उपरि रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी हे गोस्टीस इलाज साहेबी तुज येसा फर्माविला आहे की कष्ट करुन गावाचा गाव फिरावे ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहेती ते गोला करावे त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्यापासी बैल दाणे संच आसीला तर बरेत जाले त्याचा तो कीर्द करील ज्याला सेत करावयास कुवत आहे माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाने नाही त्यावीण तो आडोन निकामी जाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे बैल घेवावे व पोटास खडि दोन खडि दाणे द्यावे जे सेत त्याच्याने करवेल तिततके करवावे पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढीदिडी न करिता मुदलच उसनेच हळु हळु याचे तवानगी माफीक घेत घेत उसूल घ्यावा जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवावे या कलमास जरी दोन लाख लारीपावेतो खर्च करिसील आणि कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी ये ती करुन कीर्द करिसील आणि पडजमीन लाऊन दस्त जाजती करुन देसील तरी साहेबा कबूल असतील तैसेच कुलबी तरी आहे पुढे कष्ट करावया उमेद धरितो आणि मागील बाकीचे जलित त्यावरी केले आहे ते त्यापासून घ्यावया मवसर तरी काही नाही ते बाकीचे खडवे तो कुलवी मोडोन निकाम जाला या उपरि जाऊन पाहातो येसी जे बाकी रयेतीवरी आसेल ते कुलाचे कुल माफ करावयां खडवे तोकुब करुन पेस्तर साहेबास समजावणे की ये रवेसीने कीर्द करऊन साहेबाचा फायेदा केला आहे आणि आमकी येक बाकी गैर उसली मफलीस कुलास माफ केली आहे येसे समजावणे साहेब ते माफीची सनद देतील जे बाकी नफर निसबत आसली ते हिसेबीच उसूल घेत जाणी बाकीदार माहाल न करणे ये रवेसीने तुजला पदनसी येत तपसिलेकरुन हा रोखा लिहून दिधला आसे आकलेने व तजवजीने समजोन याप्रमाणे कारबार करीत जाणे की तुझा कामगारपणाचा मजरा होये आणि साहेब मेहरबान होत ते करणे जाणिजे र॥ छ ६ माहे रजब.

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP