मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ६६

शिवचरित्र - लेख ६६

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श्री
नकल
श.१६०७-०८
इ.१६८५-८६
महजरनामा हाजिर मजालिस बीहुजुर
राजश्री बजाजी माहाले दिमत म्यानबंक हुजरी लोक अंताजी सिवराव कवस राजमंडल म॥ येसाजीराव दरेकर सुभेदार इशमपाव लोक म॥ बहिरजी पावांर सुभेदार हशम पाव लोक दताजी विठल प्रभु सिताबराव पनवेलकर कारकून इमारती खांदेरी व कुलाबा व सागरगड अंताजी भास्कर जोगोजी फर्जन तट मजमदार हवालदार व नगोजी वाघमारे हवालदार तट
सुभा माहालानिहाई मामले चेऊल राजश्री येसवंत राजश्री गनोराव अनंत सुभेदार राम मजमदार म॥ रायाजी सतक प्रभु हवालदार मामले चेऊल म॥ त्रिबक श्रीपत सुभेदार हाशम पाव लोक मा तान्हाजीराम मजमदार जंजिरे राजकोट
कृस्णाजी माहादेव देशाई
मामले चेऊल
बाबाजी विठोजी अदकारी मामले चेऊल
दामाजी आपाजी देशाई व देशकुलकर्णी मामले चेऊल व अदकारी तपे झिराड तपे अस्टागर
देशमुख तपे अस्टमी
भिकाजी येसजी
सेलके देशाई
रामाजी नाईक भानोपं
अंताजीपंत वैदे शकीन वस्ती आगर
चेऊल
बकाल ------------
गोंवराजी चौधरी
भवांनजी बकाल
बाबाजी सोनाजी
सेलके अदाकारी
माहादुजी बकाल
पिलाजी येस प्रभु
कृस्णाजी हरी प्रभु
शामजी नाईक देवरसी
माहाजन आगर नाईक
बाबा जोसी रंगोबा आगर नाईक
विसोवा गांवडकर येसोवा खेटरा
मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल सुर सेन सीत समाणीन व अलफ हाजिर मजालिसी महजरनामा ऐसाजे पेसजी सन सलासामधे विठोजी बापुजी व गोंदोवा नारायेण व बालाजी रघुजी व मल्हारजी व शामजी तान्हाजी येही आपली वाडी खाते बनाम रगोंजी पोस प्रभु ब॥ गणेश कुक पाटेल किता १
विठोजी बापुजी प्रभु
तकसीम १॥
बालाजी रघुजी ता.॥।.
औलाद गंबाजी
तकसीम १॥
मल्हारजी व शामजी त॥ ॥।
औलाद साबाजी व हरबाजी त॥
दोन २
गोदोवा व गोजोवा
नारीजी त॥ १
तुकाजी बाबाजी १

यो वाडी किता येक हे वाडी मशहुरुल सुर्याजी विसाजी प्रभु वस्ती तपें अस्टमीं यांसी आपले अत्मंशतोंशे विकत दिधली याची किमत चौकचारे देसमुख व आगर नाईक व खासा वाढीचे हरदु खावंद जाऊन च्यारी कोन वाडीचे हिंडोन भुईमाण पाहोन किमत केली वाडी कुली बहुत सालें खराबा भाट होती झाड माड व पाणी कुल ण होतें हें मनास आणून किमत केली लाहारी बसई १२५ सवासें करुन खत फरोख्त करुन सदरहु जणी आपले निशाण करुन दिधले ते खतीं तिमाजीचा वडिल लेक सजनाजी होता त्याची औलाद जिवाजी प्रभु व व निलाजी प्रभु व गोजोवा प्रभु हे बहुत सालें बाप मेलियावरी लाहान नादान होत ते पेणामधे आजवली गेले होते तेथे दाने जाहाले या खतीं लिहिले नव्हांते सूर्याजी प्रभूस दखल न होतें सूर्याजी प्रभु सदरहु प्रो पैके दिधले पावले पावलेयाचे खत वार्साल घेतले मग वाडीमधे आपले पदरीहून पैका मबलगा खर्च करुन विहीर करुन पाणी केलें आपली वशाल केली व नवें घर बांधिलें त्यासही मबलगा खर्च जाहाला तेथें आपली वशात केली ऐसियासी सूर्याजी प्रभु रोजगाराबद्दल रायेगडास गेले होते तेथे जिवाजी प्रभु उभा राहोन वाडीची मुनसुबी सांगो लागला ते मनसुबी राजश्री पंत न्यायाधीश यांजवल गेले तेहीं खत मनास आणिले तेथे लिहिलें आहे कीं तेथे लिहिले आहे कीं वाडी आम्ही आत्मशतोश विकत दिधले आहे यासी दगदावा वारिसी आगर हरकोन्ही करील तो आम्हीं सोडऊन देऊन सूर्याजी प्रभूसी निसबत नाहीं म्हणो म्हणोन खत दिधले होते ते पाहोन र॥ [मो.जा.] पत न्यायाधीश येही जिवाजीस आज्ञा केली की तुवा जाऊन तुझे वारिसदार आहेत तेही वाडी विकत दिधली आहे त्यांचे गलां पडणे म्हणे म्हणोन बोलिले यावरी जिवाजी प्रभु म्हणो कीं आपले तक्षीमदारांवरी बाकी होती सूर्याजी प्रभूस चेऊलची मजमु होती येन्हे बाकीचे तोस्टक त्यासी लाऊन बरकस करुन जुलमे वाडी विकत घेतली म्हणोन बोलिला यावरी सूर्या [जी] प्रो बोलिले की आपनापासी मजमू होती दि दिवाणचे बाकी बदल आपणास आणून बसविले असेल अगर बाकीवरी वरात केलियाच असतील परंतु तु वाडी जुलमेने घेतली नाही म्हणोन कतबें दिधले आणि गुन्हेगारी लेहुन दिधली इतुका प्रसंग तेथे जाहाला यावरी जिवाजी बाजी प्रभु चेउली येऊन विठोजीस व गोदोवास व बालाजीस लटिक लाडें सांगोन समजाऊन त्याच्या तकरीरां जुलमेने वाडी घेतली म्हणोन घेऊन हुजूर गेला तो मोगल सन खमसामधे कोंकणामधे येऊन ळूट नागावा केला धुधल जाहाली सूर्याजी प्राची माणसे काही पालीमधे काहीं अस्टमीमधें होती ती तो आपले माणसाचे खबरेस गेला तो जिवाजी प्रभु पाचाडास गेला सूर्याजी प्रभूने आपली माणसे विल्हेवार लाऊन हें वर्तंमाण तकरीराचें कलले म्हणोन हुजूर गेला तो जिवाजी प्रभूने रोजगार करुन गेला मनसुबी तर तैसीच राहिली यावर साल मजकुरी सूर्याजी प्रभु साल मजकुरी आले यावरी येथे सूर्याजी प्रभूने विठोजी व गोदोवा बालाजी रघुजी व शामजी यांसी बिलगला तुम्ही आपणांसी वाडी आपलीले आत्मसंतोश दिधली असोन जिवाजी प्रभु म्हणतो कीं जुलमेने वाडी घेतली त्यास तुम्ही तकराराही ह्याच भातीच्या जुलमेने घेतलें म्हणोन लेहून दिधलिया आहेत तरी तुम्ही हे गोस्टीचा र्निव्हाव करणे तुम्ही जुलमे घेतली म्हणता तरी आपली यैन किमत व वाडीमधे खर्चला पैका व नवें घर बाधिलें त्यास खर्च जाहाला आहे यैसे चौगचारे जे किमत होईल ते देऊन आपली वाडी घेणे आपणाच्यान तुमसीं मनसुबी सांगवत नाही म्हणोन सूरर्याजी प्रभु बोलिले यावरी आईकत नाही म्हणोन मामले मजकुरी राजश्री येसवंतराव अनंत सुभेदार याजवल वर्तमाण सांगितलें त्याजवरुन त्यांसी बोलाऊन नेले यांवरी तेथेंही विठोजी प्रभु व गोदोवा प्रभु येही तकरार केली कीं वाडी आम्हास बाकीची तहसील लाऊन जुलमेच वाडी घेतली म्हणोन तकरार लेहोन दिधली यावर गोही साक्षे आणून खरे खोटें करावे म्हणोन त्या दोघाचा कतबा घेतला जरी हे गोस्ट खोटी जाहाली तरी दिवाणचे गुन्हेगार म्हणोन कतबा घेऊन हे मनसुबी राजश्री बजाया माहाले दिमती म्यनबक हुजरी लोक याचे श्वाधीन करोन मनसुबी करविली यावर राजश्री बजाजी माहाले येही कुल हाजिर मजालिसी बैसऊन मनसुबी आरंभिली  व खतावरी देसमुखाच्या व भले लोकाच्या व हमशाई यांच्या गोही होत्या त्यासी बोलाऊन मनास आणिता जुलूम केला नाहीं आत्मसतोश वाडी विकीली हे खरे जाहाले यावरी सूर्याजी प्रभु म्हणो लागले कीं हे वाडी आह्मास येंही आत्मशतोंसे दिधली आणि जिवाजे प्रभु उभा राहून मनसुबी सांगो लागला पांच सा महिने आपणासी कस्टी केलें ऐसाच हर कोण्ही दुसरा उभा राहोन मनसुबी सांगाला तरी आपण काये करावें आपणाच्याने मनसुबी सांगवत नाहीं तरी वाडी यांची यास देवणे आण आमचा पैका जो खर्च जाहाला आहे व ऐन किमती दरमोल करुन जो हक हिसाबी होईल तो देवणें म्हणोन बोलिले यावर बालाजी रघुजी म्हणो लागला की वाडी आपण यांसी विकत दिधली ते दिधलीच आहे आपणाच्याने पैके देवत नाहीं आपण वाडी घेत नाहीं म्हणोन बोलिले १ यावर बालाजी रघुजी म्हणो लागला की विठोजी प्रभु व गोदोवा व शामजी यासि पुसिले तुम्हीच वाडी घेने याचे पैक चौकचारे होतील ते देणे त्या वरी तेही म्हणो लागले कीं पैके आपणच्याने देवत नाहीं वाडी दिधली ते दिधली म्हणोन बोलिले यावर हाजीर मजालिसी बोलिलें कीं बरें तुमचा वारीस सजणाजी तिमाजी याचे लेक जिवाजी व निलाजी व गोजवा प्रभु उभे राहिले आहेत त्यासी तुम्ही समजावणे म्हणोन हाजीर मजालिसी बोलिले यावर विठोजी प्रभु व गोदवा प्रभु म्हणो लागले कीं हे आपले वारीस नव्हात शामजी प्रभु व बालाजी प्रभु याचे निसबतीचे आहेत हे तेही समजावावे म्हणोन बोलिले यावरी बालाजी रघुजी येही कबूल केले याखेरीज दुसरा कोण्ही वारीस उभा राहिला तरी ज्याचे निसबतीचा असेल तेण्हे समजावावा म्हणोन बोलिला हे गोस्ट अवघे वारिसदार विठोजी व गोदोवा प्रभूने न्याये केली यावरी सदरहु प्रो बालाजी रघुजीचे पत्र घेविलें की बहुत बरे जिवाजी व निलाजी व गोजोबा प्रभु हे तुम्ही वारीस तुम्ही समजवावे कीं सूर्याजी प्रभूसी नि॥ नाहीं म्हणोन आपलें पत्र दिल्हे त्यावरी बालाजी प्रभूणे निशाण करुन दिधला यावर हाजीर मजालिस गोही जाहालिया पत्र मुस्तेद जाहाले पुढे विठोजी व गोदोवा प्रभूने बालट कले होते हे खरे कदबे राजश्री [मो.जा] सुभेदार व र॥ न्यायाधीश यांजकडे दिली आहे ते त्याची गुन्हेगारी लागेल म्हणोन पलोन गेले वाडी काही सूर्याजी प्रभूनी जुलमे घेतली नाहीं हे खरे जाहालें सूर्याजी प्रभूने लोकांचे साक्षेने खरेदी केली ते सूर्याजी प्रभूचे हवाला हाजीर मजालिसी हवाला केली सूर्याजी प्रभूनें सुखे आपली पुत्रपौत्रानी उपभाग करावा व विठोजी व गोदोवा व बालाजी व शामजी व निलाजी व जिवाजी व गोजवा यांस अर्थाअर्थी समध नाही हाजीरनामा सही.

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP