मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ५०

शिवचरित्र - लेख ५०

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


नकल असलप्रा असे
श.१५८५ आषाढ शु.१२
इ.१६६३ जुलै ७
॥र्द म॥ अनाम राजश्री कारकुनानी हाल व इस्तकबाल व माहाजन मोकादमांनी व माहातारे व मडवी रयानी म॥ हाये व तपे हाये मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल सु॥ आर्बा सितैन अलफ खुर्दखत सु॥ छ २४ जालाखर दरसाल स [न स] -लास सितैन व अलफ तेथे रजा जे मामले मजकुरीं देसकुलकर्णी जमेची वासलात मजमु मुकाबलेयासी लिहीत नाही व तपोतपां तपेकुलकर्णी नाही याकरितां कारकुनांस ततोतपां मोझ्या मुकाबला नाहीं कुलाचा पैका गैरमोझ्या मुकरातीस पडतो निसींदे तर येक जातो येक राहातो बाकी साकी कुल .... ट मुखलिस गयाल मयेत न कले तपेयाचे कारकून गुम होतात त्यास आपाजी तावजी देसकुलकर्णी हा मिरासी आहे त्यास मदतीस यारिदी दिधलिया तपोतपां आपले निसबती यारिदी तपीयाचे कारकुनाजवल ठेवील आणि जे सा तपांचा निसींदा रोजकीर्दी रोज घालितो तैसा कुलकर्णियाचा यारिदी रोजकीर्दी दरोज घालील आली तहसील ते सहे ल्याहावी रोजकीर्द ब॥ गावगना दुफर्देत सहे घालावी हुजत गावांस कारकुनाने तपांच्या कुलकर्णीयाचे यारदीयाचे गुजारतीनें गावाच्या माहातार्‍या मढवीयाजवल द्यावी त्यास जे तेरखेची असेल ते तेरखेचे रोजकीर्दीस कुलकर्णीयाचे हुजतीची तसलमात ल्याहावी परमाहिरे ते गावांस हुजत कारकुनानी ने द्यावी जे जे देणे त्यास दखल करुन तो आपले रोजकीर्दीस तसलमात लेहून देईल आणि त्या तपेकुलकर्णी यारिदी ते सहे साल जालिया निसींदेयास तपांचा घडणी बाकी तजकरा वासलाद गावगना रुजू करोन द्यावें गाव लिहिणार जे आहेत ते गावाचे कुलारग लिहितील येणे गाव वासलात ल्याहावी यामधें कारकुनास दुसरा मोझ्या मुकाबला जाला बदलामी चुकली आपाजी तावजीचे निसबतीने यारिदी दिधले त्यां तपां बरें वाईट ते सहे दखलगिरी करावी रास अमल वर्तावें येसी आम्ही तपोतपांची विल्हे केली आहे मुशारा रयेत निसबतीने द्यावा त्यास रयेतीचे तुम्ही समाधान करणे आम्ही आणीक दुसरे ठाई तुम्हास येसान करुन यामधें तुमचाही फाईदा आहे येसे त्यांचे समाधान करुन तपोतपांनीसबत आपाजी तावजी देसकुलकर्णी याचे यारिदी ठेवणें त्यास तो अस्टागरी कुलकर्णी मिरासी आहेत ते वजा करोन बाकी यारिदी कुलकर्णी ठेवणे.
तपे श्रीगाद पाल

तपे खांडाले

तपे परहूर

तपे ब्राम्हणगाऊ

तपे झिराड

तपे उमटें

तपे अस्टागर पैकी ज्या माहाली मिरासी कुलकर्णी आहेत ते वजा करुन बाकी महाल व पेठ नऊदरें व खारिया १
येणेप्रमाणें यारिदी मामले मजकुरीहून ठेवणे त्यास अवल तैनात सालिना लारी १२० व दूम लारी १०० येक सीम लारी ८० असी येणे प्रो। तुम्ही माकुल गैरमाकुल मनास आणून सदरहू तैनाती त्यांस करुन तपेहाये मामले मजकूरची लिहिणेयाची येणे प्रो विल्हे देखोन त्याची चाकरी घेऊन त्यांस रयेत निसबती मुशाहिरा देवीत जाणे तपेयाखेरीज कसबा राहिला तो खांसा कुलकर्णी व त्याचे यारिदी कसबेयाची रोजगार तहसील लेहावी व तपोतपां लिहिणे माफीक सारिखें तपियास कागद बाबा तुम्ही मोईन करुन देऊन सदरहु विल्हे करुन सुभां खबर लिहिणे येसा हा माहातारा मडवी खोटाई करुन मणेल कीं मी मागे पैके दिल्हे यैस्या खोटास यारिदी देसकुलकर्णीयाने समजवावें त्याच्याने त्या कुलांसी रुजु मुकाबला नव्हेल तर तो मोझ्या आपाजीने करुन द्यावा म्हणोन रजा ब॥। रजा आपाजी ताउजी देसकुलकर्णी यास ब॥। रजा सांगोन आपाजीचें निसबती तपोतपां यारदी ठेविले आहेत ते यारदी तपांचे निसींदे रोजकीर्द घालितील तैसा तो कुलकर्णीयाचा यारदी रोजकीर्दी रोजबरोज घालील आली तहसील लिहील रोजकीर्दी ब॥ गावगना दुर्फद घालील हुजत गावांस कारकून तपांचे देतील ते तपांचे यारदी याचे गुजारतीनें द्यावी येणे प्र॥ आपाजी तावजी देसकुलकर्णीयाचे निसबतीने यारदी ठेविले आहेत त्यांस तैनात तपांहून कागदबाब मोईन बीत ॥
तपे बाम्हणगाव सालिना
आरी १३८०
तो खांडाले सालिना
लारी ११५
तो झिराड सालिना
लारी १३८
मुशाहिरा यार दी सालीना
लारी १२०
कागदबाहा सालिना
लारी १८
मुशाहिरा यार
दी सालिना
लारी १००
कागदबाहा
सालिना
लारी १५
मु॥ यारदी
सालिना
लारी १२०
कागदबाहा
सालिना
लारी १८
तो परहूर सालिना लारी
११५
तो उमटे सालिना लारी
११५
तो श्रीगाव व तो पाली
सालिना लारी २३०
मु॥ यारदी
सालिना
लारी १००
कागदबाहा
सालिना
लारी १५
मु॥ यारदी
सालिना
लारी १००
कागदबाहा
सालिना
लारी १५
मु॥ यारदी
सालिना
लारी १००
कागदबाहा
सालिना
लारी १५
मु॥ यारदी
सालिना
१४० श्रीगाव
६० पाली
---------
२००

कागदबाहा
सालिना
२४ सिरगाव
६ पाली
-----
३०

तो अस्टागर जे माहालीं मिरासदार कुलकर्णी आहेत ते वजा करुन बाकी देहाये व खारिया व नवदर सालिना लारी ९४
मुशाहिरा यारदी
सालिना लारी ८४
कागदबाहा लारी १०
यो मुशाहिरा यारदी व कागद बाहा सालिना लारी ९४५ येणे प्रा रयेत नि॥ सालिना दस्तावर वाटणी करुन आदा करीत जाणे आण सदरहु लिहिले प्रा देसकुलकर्णीयाचे यारदी तपोतपां लिहिणे घडणी बाकी तजकरा लिहितील बाकीचा मोझ्या मुकाबला करितील साल जालियावर तपांचे घडणी व बाकी रुजु करितील येणे प्र॥ करोन आपाजी ताउजी पासोन ततोतपां यारदी ठेविले आहेत ते ठेऊन वासील बाकी लिहितील त्यास सदरहु प्र॥ तैनात व कागद बाहा रयेत निसबतीन द्स्तावर वाटणी करुन आदा करीत जाणे तालिक घेऊन असल खुर्दखत आपाजी ताउजीजवल देणे र॥ छ ११ जिल्हेज

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP