शिवचरित्र - लेख ३६
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[१ फार्शी शिक्का व मजकूर]
श.१५५८ ज्येष्ठ शु.१३
इ. १६३६ जून ६
श्री साळिवान सके १५५८ घाता नाम सवंसरे जेस्ट सूर्ध त्रयोदसी सोमे तदिन खत विकरीत बेस्मी नारोवा गणोवा बरवा सेकीन माहाळ केहीम तपे आठागरु मामंळे मुर्तजाबाद उर्फ चेऊळ सु॥ सन सीत सळासीन व अळक कारणे आपाजी ताउजी देसाई व देसकुळकर्णी मामळे मजकुरु व अदिकारी तपे आठागर व तपे झिराड यासि आपण आपळेनी आत्मसुखे खत विकरीत ळेहोनु दिधळे यैसे जे आपळी मिळकती बी त॥
वाडी करदीळ किता येक १
याच्या हदा बीत॥
पूर्वे हद निमकागर
मळा वरीसभाट बो माहातारे येक १
दक्षेणे हद वरनमला
बो वर्तक माहातारे
मळा लाणा बो
बेड म्हात्रा येक १
पसीमे हद मलेखंडा बो हरबा
दातार निमे पासुनु
सर दे तहद समुद्र
उरमळ बो लखम म्हात्रा
येक १ उतरे हद राजगोवण
या चहु हदासी जमीन जल व स्थळ माड व सुपारी व ताड व बाजे हरजिनसी झाडे व राहाट व राहटवडीसहित वाडी व मळे मजकुरु तौर रकबद आपण आपळे आत्मसुखे तुम्हास विकत दिधळे असे वाडी मजकुरु देखील मळे मजकुरु याचि किमती ळारि २०१ दोनसे येक जाळी ते आपणास रोख पावळी असे आता वाडी व मले मजकुरु याचा भोगवटा व तसरुफती तुम्ही आपळे पुत्रपौत्री कीजे आपणास व आपले पुत्रपौत्री वाडी व मळे मजकुरासी अर्थाअर्थी काही सनामध नाही यावरी हरकोण्ही दगादावा करील तो आपण सोडउनु देणे वाडी मजकूरचे निसबती कुलवाडी बारस [त] बु॥ आहे ते देखील भाट व भोमे तुम्ही कमावीस करणे व सीळोतरी महथळ व बाजे वतु व सर्व सारे व राई कंदार व मुतफरोसी व कुलबाब व कुलकानू व पटी पायेपोसी व न॥ पटी व पटिया र॥.... ळास व समत व मामळे ..... [म] जकुर मिलोनु मोईन मोकदर हुडा कुळबाब कुळकानु मिळौनु वाडी देणे आहे ळारि बावन ५२ बीत॥ [फार्शी शेरा]
वाडी करदीळ महसूल
व बाजे वतु ळारि २०६०
बारसेत महसूल
व बाजे वतु
ळारि ८
जेवा ळारि १००
राई व कंदार
ळारि ६
तांड ळारि २
पटी पायेपोसी
व सरनाजीरपटी
व सेतसारा व शावणी
व कापुरपार्हक व बोखार
टका व पटिया र॥ खाने
खास व समत व मामळे
मजकूर व समत व मामळे
मजकूर व महाल मजकूर
व भूतफरोसी कुलबाब
मख्ता ळारि १५
येण्हेप्रमाणें साळिना माहाल मजकुरी आहे ते सन सबापासुनु सदरहुप्रमाणें तुम्ही देत जाणे आपणास निसबती नाही व जुनी खते वाडी व मले भाटीची होती ती तुम्हाजवळी दिधळी असती हे आपले खत विकरीत सही किमती सदरहु पावली असे
[फार्शी शेरा] ळारि २०१०
गौही
माहाळ थळ
बाग दर्णा माहाल थळ
बि दस्तुर रुस्णाजी कमाजी
कुलकर्णी माहाल मजकुरु
भानजी श्रीपती सहस्त्रबुध्य
[बालबोध सही]
खतप्रमाणे साक्ष बाब जोइसी भीक
जोइसी प॥ भारेसी
माहाद मात्रा बेड म्हात्रा
माहाळ थळ
माहाल केहीम
येस काटिया
केसोवां बोडस
दाद काटिया
तुक माहातारा बिन
भीक माहात्रा
तान राउल
गण माहात्रा बाग माहात्रा
बाबा बका खोज बिन कुरज
माहाल आव्हास
गोपाल वर्तक जस वर्तक
माहाल मजकूर
खतप्रमाणे साखे मदनजी दामाजी प्रभु
खत प्रमाणे स॥ बापूजी तान्हाजी प्रभु
येस राणा माहाल आव्हास
[कांहीं खुणा व खालीं]
खतप्रमाणे साक्ष से सैद चाद बीन
सैद मुर्तजा मला? पारसी निसाण आहे
[उजवीकडे समासांत]
नारोबा गणोबा बरवा सो केहीम
N/A
References : N/A
Last Updated : February 24, 2019
TOP