मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ७५

शिवचरित्र - लेख ७५

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

श्री
[ले.६९ प्रा.शि. व मो.]
श.१६११ मार्ग. व.१२
इ.१६८९ नोव्हें.२८

अज माहाल चेऊल मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल त॥ रयान देहाये प्रांत चेऊळ व माहाल कसबा व आगर मामले मजकूर सु॥ तिसैन व अलफ मशहुरुल अनाम बावाजी विठोजी अदिकारी मामले मजकूर येहीं माहालीं येऊंन विदित केले ऐसे जे आपल्या वतनाच्या इनामती व इसापती राजश्री [मो.जा.] कैलासवासी राजे यांचे अमलापासून हक सरकारी जमां धरला आहे त्यासिवाई आपला कानूकाइदा रयेतनिसबत चालत आहे बीतपसील
दत व प्राइस्चिताचा सेला कलम १
जोइसी व उपाध्ये ब्राह्मणं याती गोलक
यांजकडे हक कलम १
डाकी स्थल व नुरी स्थल मोहतर्फी यांजकडे महासूल कलम १
मोहतर्फी कुले यांजकडे सण दिपवाली व सिमगा व सवंत्छरप्रतिपदा
निनसप्रो कायदा कलम १
येणेप्रो सुदामत भोगोटा आजपर्यंत चालत आहे त्यास कोण्ही येक हरकत करुंन जानीत नाहीं याजकरितां माहालीं येऊन विदित केले त्याजवरुन सुदामतीचा दाखला प्रांत मजकुरचे जमीदार व मोख्तासर व रयेत यानजीक मनांस आणितां सुदामत पेस्तरपासून चालत आले आहे हालीं त्यामोजीब अदिकारी मारनिले यांचा हकलाजिमां देत जाणे उजूर न करणे जाणिजे र॥ छ २५ माहे सफर [नि.] मोर्तब सुद [म.ब.मो]

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP