मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख १९

शिवचरित्र - लेख १९

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[आरंभी फा.म.]
श. १५२८ माघ शु.१४
इ.१६०७ जाने.३१

अज दीवाण र॥ खांस बजानेबू सरसमत व कारकुनाची हाळ व इस्तकबाळ व देसाई व अदिकारियानि मामले उरुफ चेऊल सु॥ सन सबा व अलफ पदाजी बाबजी व कृस्णाजि पदाजी खेत्री कसबे चेऊल मामले मजकूर हुजूर येऊन हजरती आपला हाळहवाल मकसूद मालूम केळा तेण्हेप्रमाणे हुजुरुन खातीरेसी आणोन सरंजाम केला असे बीत॥ [फा.शेरा]
येकोजी कृष्साजि प्रभु व कुमाजी भायाजि प्रभु व मुरार प्रभु व गोविंद प्रभु व बाजे कर्जदार यासि कर्ज आपण पैके देऊन खारिया वाडिया गाहाण घेतलिया आहेती त्याचा हसीळ आपणासि नुमा सौदागरी दिधळा आहे सदरहू नुमेयाचे कतबे आपणाजवली गौहीनसी आहेती आणि नफर मजकुरु सिरजोरी करुन हसील नेताती आणि मुदल पैकेही देत नाहि तरी ताकीद फर्माऊन ब॥ हिसेबी देवणे ज्यास मवसर नसेल जे वीत गाहाण दीधळे आहे ते विकून देवणे त्याचि तिजाई माफ करणे म्हणोनु तरी जाब सरंजाम याचे कर्ज ब॥ कर्ज कतबे काजीचे सिक्लीसी ? असतील तेण्हेप्रमाणे ब॥ हिसेबे याचे कर्ज देवणे ज्यासि मवसर नसेल आणि याचि वाडी व खारिया यासि गिरो पडिळे असेल तो राजी होऊन कर्जाबदळ वाडी व खारि खडून देईल तरी देवणे अगर नैदीळ तरी ब॥ सरा अमळ करणे मोहोर्तबू
[फा.शेरा]
गांव व खारिया आपणासि खोती आहेती तेथील भात कसबेयात घेऊन येतो घासि आणितो त्यासि साळाबाद जकाती नाहि तेण्हेप्रमाणे चालवणे म्हणोन तरी जाब सरंजाम कारकीर्दी सळाबतखान सालाबाद जैसी कमावीस चालत असेल तेणेंप्रमाणे चालवणे मोहोर्तबू
[फा.शेरा]
खारि चिचोली त॥ परहूर याचे सेत बित॥
राजणखारि व माडवखार भांगार भात मसणवटी गळा गला कलस कलसवेले कलसवेळे वेले मुडे खडि २०  १॥ .॥.  येकून माहिमी मुडे ३०१६ व नख्त कारुके व असताना ळारि ५० हे सिलोतर बेरीज दर हरसाल उगवणी करितो पेस्तर सदरहु बेरीजप्रमाणे उगवणी करीत जाणे ज्याजती तसवसि ळागो ने दणे व पटिया व गडछावणि साळाबाद नाहि यासि तसवीस ने दणे व खारिचे प्रजास बस्ती ब॥ टेभ कोली निसबती मौजे चिचोली दीधळे आहे तेथे प्रज वस्ती करुनु राहातीळ त्यासि मौजे मजकुरीचे व कोलियाचे निसबती न लवणे तसवीस ने दणे मौजे मजकुरीहून पाणवेठी व कारुक सिंगोटी व खार देणे व हर बाबे तसवीस ने दणे व खारि सिरोले व मेरी सिरोली नजीक बांस देणे खारि सिरोली नजीक बांस देणे खारि सिरोली रकम मेर सिरोली खा महसूल गळा काल बास द्यो? गळा खडी.॥. कल खडी .।. येकून खडी तीन [पाऊ] .॥।. हे आपण सिळोतरी हसील उगवणी करितो तेची बरहुकूम उगवणी करणे ज्याजती तजवीस ने दणे व पटिया व छावणी सालाबाद नाहि त्याचि तसवीस ने दणे मौजे वैजालीची निसबती ळाऊन पाणवेठी व खार देणे व कारुक सिगोटी व वेठी बेगारि व हर बाबा तसवीस देतील ते मना करणे व खारि मेर कौसल देऊ बाजापूर याचा महसूल गळा केले खडी येक साळाबाद पेठा खाळे देतो तेण्हेप्रमाणें चालवीत जाणे याखेरीज ज्याजती तसवीस हरयेक बाबे ळागो ने दणे म्हणौन तरी जाब सरजाम ब॥ कमावीस सालाबाद चालविळे असेल तेण्हेप्रमाणे चालवणे नवी जिकीरी न करणे मोहोर्तबू [फा.शेरा]
फितरतीकरिता रेवदडियासि जाऊन राहिळो आहे अतां चेउलास येऊन वस्ती करावया पाहातो तरी मागील गुन्हा हरयेक बाबे असले तो माफ करणे ये बाबे तकवेतीचा कौलु म‍र्‍हामती जाहालिया चेउली आपले घरि कवीहाल होऊन राहोन व खारियासि व वाडिंयासि व गावास फर्मान व मामळाचे कौलु आहे ती तेण्हेप्रमाणे पाळणे ज्याजती होने दणे म्हणौन तरी जाब सरजाम पेसजीचे गुन्हा ब॥ मामुरी माफ केळे असे हे कसबे मज कुरासि येऊन राहातील यासि तुम्ही तसवीस ने दीजे मोहोर्तबू [फा.शेरा]
आपण वडियासी व खारियासी व गावास खुलगे व म्हैसी व बैल खरीद करितो त्यासि सालाबाद जकाती नाहि तेण्हेप्रमाणे चालवणे व खारिया व गावचा गळा विकितो त्यासि जकाती सालाबाद माफ आहे तेण्हेप्रमाणे माफ करणे व वर्‍हाडटका आपणासि माफ आहे तेण्हेप्रमाणे वर्‍हाडटका आपणासि माफ करणे म्हणौन तरी जाब सरंजाम ब॥ सालाबाद जैसी कमाविस चालिली असेल तेण्हेप्रमाणे कमावीस चालवीजे मोहोर्तबू [फा.शेरा]
बाजारांत कालगड व खर्बुजी मेवा साग सबजी व तर मेवा बाजारामध्ये विकावया आणिताति त्यासि वानगी माफ म्हणोन फर्मान कारकीर्दी हजरती मुर्तजा निजामस्या [सादीर] आहे दरीवख्त वागगीची तसवीस देताती तरी ब॥ फर्मान पेसजीप्रमाणे वानगी माफ करणे तसवीस ने दणे म्हणौन तरी सरजाम ब॥ फर्मान ब॥ मुर्तजा निजामशा व कारकीर्दी बुर्‍हानस्या जैसी कमावीस चालिली असेल तेण्हेप्रमाणे चालवणे मोहोर्तबू [फा.शेरा]

आपली घरें व दुकान व आपळे बिराजरांची घरे व दुकाने कसबे मजकुरी आहेती त्यासि साळाबाद भाडे ळारि नाहि हाली भाडे ळारि मागताती आणि फिर्गीयाचे फितरतीकरिता दुकान घरे मोडिले व जळाली आहेती बाधावया उमेद होत नाहि तरी ब॥ सालाबाद प्रमाणे भाडे ळारिची तसवीस दुरी करणे म्हणौन तरी जाब सरजाम कारकीर्दी ब॥ बुर्‍हान निजामस्या जैसी कामाविस चालिली असेल तेण्हेप्रमाणे चालवणे नवी जिकीर न करणे मोहोर्तबू [फा.शेरा]
नउदर सोनवाडी फिरंगियाचे सरदेसी आहेती फिरगियाची तसवीस करितां वडिवल थाबत नाहि याकरितां वाडी मामूर नव्हे खराबा पडिळे आहे याचा माहासूल मोईन दर हरसाल ळारि दोनी देत जाणे म्हणोन मामलाचा कौलु अहे तरी ब॥ कौलु मामळाप्रमाणे दर हरसाल ळारि दोन देत जाणे ज्याजती तसवीस ने दणे म्हणोन तरी जाब सरजाम ब॥ कौलु सालाबाद जैसी कमावीस चालली असेल तेण्हेप्रमाणे कमाविस कीजे. [फा.शेरा]
खारि ढेरण व मेर स्याहापूर तो श्रीगौ याचा माहासूल सिळोतर माहिमी मुडे ६०१० व कारुक व आखताना ळारि ८॥ आहे त्याचि उगवणी करितो पेसजी कृस्णाजि तबीबराऊ किले खेडदुर्ग त्यासि तनखा दिधळा होते त्यावरी ळारि १४ चढऊन दीधळे होते आपण तर सदरहु सिळोतर रकम ळारि ८॥ व गळा मुडे ६०१० येरीती उगवणी करितो ज्याजती दिधळे नाही हाली तबीबरायाचा चढ साधणुक लारि ३४ याचि तसवीस देताति तरी ळारि ३४ टुरी करणे ये बाबे मामलाचा कौलु आहे ब॥ मामळा तसवीस न देणे पेस्तर खेरीज सिलोतर कदीम आहे ते घेणे ज्याजती तसवीस हो ने दणे व्र खारिस पटिया व गडछावणी नाहि व वेठी बेगारि हरयेक बाबे तसवीस नाहि तेण्हे प्रमाणे चालवणे व खारि शाहापूरचे टेम खारि मजकुरास वस्ती बदल आहे तेणेप्रमाणे चालवणे म्हणोन तरी जाब सरजाम कदीम कानु संचणी मनसूरखान जे बेरीज असेल तेणेप्रमाणे उगवणी करणे कारकीर्दी सुरुरखान नवी जिकीर केली असेल ते दुरी करणे तसवीस ने दणें मोहोर्तबू [फा.शेरा]
खारि खोबणे व खारि गोपचर्‍ही गबाजी व धर्माजी व त्याचे बिराजर यांपासून विकत घेतली आहे यांचे खतकाजी व सैद सादात व कतरयुदा व देसाई व अदिकारी यांचे गोहीनसी आहे यैसे असोन गंबाजी धर्माजी मजकूर गडगकरी किले खेडेदुर्गकर याचि हिमायेती करुन व आपण हरकत करुन खारियाचा गला जुजवी नेताती व दोही देताती हरकती करिताती त्यासि ताकीद करणे त्यासि खारियाचे वाटे जाऊ नेदणे जो गळा नेला आहे ते देवणे त्यापासि कर्ज आहे ते ताकीद करु देवणे खारिया महसूल ब॥ कौलु ठाणेप्रमाणे घेणे ज्याजती तसवीस ने दणे म्हणोनु तरी जाब सरंजाम यांचे कर्ज ब॥ सरा हिसेबे असेल ते ताकीद करुन देवणे मोहोर्तबू [फा.शेरा].
पेसजी आपण कसबे मजकुरी सौदागरी उदीम प्रवर्त करीत असो त्याची जकाती निमेप्रमाणे सोलवेस वजा होऊन देत असतो तरी दरीबाब कौलु मर्‍हामती जालियावरी उदीम प्रवर्त करुन त्याची जकातीं निमेप्रमाणे सालेवीस वजा करुन ब॥ पेसजीप्रमाणे देत जाणे ज्याजती तसवीस होऊ ने दणे यैसा कौलु मर्‍हामती होये व उदीम प्रवर्ते करिता जकातीचा खोत व कारकून तकदमा कर्ज मागतील तरी त्यासि तकदमा देऊ ने दणे जे वख्ती हसील होईल ते वख्ती देत जाऊन ये बाबे फर्मान पाळणे म्हणोन तरी जाब सरंजाम ब॥ फर्मान बसिके यास कमावीस त॥ सीत अलफ चालिंळे तेण्हेप्रमाणे कमावीस कीजे नवी जिकीर न कीजे मोहोर्तबू [फा.शेरा]
खोडदाम दर नफर टका बुजरुखी १।४ वर्तलाचे रुके ६ येणेप्रमाणे घेणे म्हणोन कानु आहे हालि ज्याजती तसवीस देताती ब॥ कानु सदरहुप्रमाणे घेणे ज्याजती तसवीस लागो ने दणे म्हणोन तरी जाब सरजाम सालाबाद कमाविस चालिली असेल तेण्हेप्रमाणे चालवणे नवी जिकीर न करणे मोहोर्तबू [फा.शेरा]
मौजे चिचोली तो परहूर बागां आपणासि खोती आहे रकम बेरीज मन सूरखानि महसूल व बाजे बाब सर्व सार व बाजे बाब ळारि ३७३ व पायेपोसी व सरदेशमुख व नाजीरपटी ळारि ४३ व सराफ पटी ळारि १ येकून लारि ४१७ व गडछावणी बेरीज आपण उगवणी करितो यावरी आपणासि मौजे मजकूर सिलोतर करुन देणे सदरहु बेरीज आपण दर हरसाल उगवणी करीत जाईन व सरसमत व कारकून मामलेयासि येताती ते लागवन घेताती याकरिता गैर्‍ही तसवीस होते प्रजा रजसि होताती तरी आपण सिळोतर बेरीज सदरहु उगवणी करीन तेही ळावगन ने घणे व मुस्तकबाल ने दणे फसल हगामी उगवणी करीत जाणे व पचोतरी भता ने घणे तहसिलदार येईल तेण्हे अढीसेरी रुके ६ साहा व भता घेणे व याखेरीज ज्याजती तसवीस ने दणे व मुकासा व इनाम व तनखेदार चालले तरी सदरहु बेरीज सिलोतरप्रमाणे घेणे गाव काबीज करविळा तरी गाव काबीज करुन देणे व मौजे मजकुरी नवेदर वाडी भोनसर आहे ती त्याचा महसूल ळारि १०० आहेती घेत जाणे ज्याजती हरयेक बाबे तसवीस ळागो ने दणे व पटियाची तसवीस ळागो ने दणे व मौजे मजकुरी चि गौली मौजे चिचोली व मौजे वैजाली तपे परहूर तेथे सालाबाद गौलेयाचे म्हैसी आटवडे आहे तो घेताती आणि दुबारा सिमगेयामध्ये येऊन दोन तीन म्हीने राहोन गांव खावविताती खराब करिताती तरी त्यासि दुबारा येऊ ने दणे म्हणोन तरी सरजाम ब॥ संचणी मनसूरखानि बेरिजेने सिलोतर करुन दीधळे असे मोहोर्तबू [फा.शेरा.]

सदरहुप्रमाणे कमावीस व पालणूक कीजे तक्रारफिर्यादी येऊ ने दीजे तालिक घेऊन असल फिराऊन दीजे मोहोर्तबू [फा.शेरा]
तेरीख १२ माहे सौवाल
समस असर अलफ.
प॥ मीर अबदुल फते

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP