मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ३१

शिवचरित्र - लेख ३१

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[एक ओळ फार्शी मजकूर]
श.१५४६ पौष व. ७
इ. १६२४ डिसें. २३

ई कौळू दादे अजराखाने खु॥ सैद अजम सेख माहामद कळबलाई खोतु महाल सासवने तपे आठागरु मामले मुर्तजाबाद उरुफ चेउलु त॥ ताउजी नागोजी देसाई व कुलकरणी मामले मजकुरु व अदिकारी तपे आठागरु व तपे झिराड सिलोतरी नउदरवाडी ही वाडी व सेत राजमला माहाल मजकुरु स॥ समस इसरीन अळफ दादे कौळुनामा यैसाजे सदरहु नउदरवाडी मजकुरु व सेत मजकुरु तुमचे कदीम सिलातर आहे याचा सिलोतरी महसूल कदीम सालाबाज महाल मजकुरु खाळी उगवणी करिता लारी ८०
नउदरवाडी बीघौड लारी ५०
सेत राजमळा लारी ३०
येण्हेप्रमाणे माहाल मजकुरी दर हरसाळ देत जाइजे याखेरीज पटिया मामले मजकुरु माहाल मजकुरु व अजातीत र॥ खास व मामले मजकुरु व माहाल मजकुरु व वेठी बेगार व जाबत फर्मास व हरयेक बाब सालाबाज निसबती नाही तेण्हेचप्रमाणे तसवीस न लगे व वाडी मजकुरी अनाडी व वाडिवल वसतील त्यासी हरयेक बाबे सालाबाज निसबती नाही तेण्हेचप्रमाणे तसवीस न लगे व बैळ व खुलगे नउदराकारणे व सेताकारणे द्याल त्यास कारुक सिगौठीची निसबती नाही तेण्हेचप्रमाणे तसवीस न लगे येण्हे कौळे तुम्ही आपळे औलाद अफलाद वाडी नउदर मजकुरी व सेत मजकुरी किर्दी मामुरी सुखे कीजे कोण्हे बाबे ताळुक अंदेसा न कीजे [फार्सी अक्षरें]
तेरीख २२ रबिलौवल

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP