मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ८३

शिवचरित्र - लेख ८३

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक

श्री
श.१६१५ कार्तिक शु.१३
इ.१६९३ आक्टोबर ३१
रामराम

श्री सकलगुणअशेषऐस्वर्ये अखिलपरोपकारेणकपरायेण राजश्रियां विराजित राजमान्ये राजश्री दामाजी आपाजि प्रभु देशाई व देशकुलकर्णी मामले चेऊल व अदिकारी तो झिराड व तो अस्टागर मामले मार गोसांवी यांसि

श्नेहांकित रामाजी कामत मो मुबै कृतानेक-विनती विशेष अत्रैव कुशल श्री ------ लक्मीकांत कृपये विमलता परिसोन श्वकीयें स्वानंद लेखन करीत गेलें पाहिजे यानंतर बहुत दिवस जाले स्वकीयें पत्र पाठऊन परामर्ष केला नाहीं यैसें तों विहित नाही परंतु कालवर्तमान व राजकी उपद्रवास्तव पूर्वस्नेहस्मरणास विक्षेप पडोन परस्परें पत्र लेखनास विश्मृती जाली याउपर क्ष्णाक्ष्णां पत्रद्वारा दर्शन देऊन परामषास अविस्मर असिलें पाहिजे यानतर ये जागां कुणबीचे खागरी आहेत त्यांचे यातीमध्यें झोल म्हात्रा व जंवर म्हात्रा हे गोसंवियेही मुख्ये करुन त्याच्या यातीचा कारभार हर दोजणांचे सिरीं स्थापिला आहे त्यास तेही तों कितेक अनराहाटी वर्तणुक केली आहे सातांपांचानसीं ते दोघेजण येकीकडे आणि त्यांचे यातीचे पनास पाउनसें येकीकडे त्यास पनासपांउणशांस सदरहु हर दोज[ण] येकंदर मानीत नाहीं आपल्याच मतें हाली पाटेल याचा भाचा विनाम बाला पारसियांचे घरीम भ्रष्ट जाला तो यातीमध्यें घेतला व वेंटा आगरी लाहानपणीच मंनजी देवजी याचे घरीं राहोन जेवीत खातसे मनजी म्हणजे त्याचा मर्‍हाष्टधर्म मात्र परंतु वरकड अवघा आचार मुसलमानाचा त्याचे घरीं जो भ्रष्ट जाला तोही दरम्यानेच यातीमध्ये घेतला व हालीं सांप्रत धर्मोजी पणवेलकर येच रीतीने यातीमध्यें सरता केला ज्यास यातीमध्यें घ्यावयाचे त्यांस घेतात नेघावयाचें त्यासही घेतात कांहीं बंद राहिला नाहीं पारसियांमध्यें गेला तों सारिखा यातीमध्यें घेतला पुढें मुसलमांन व माहार राहिले तेहीं यातीमध्यें घेतील झॊल म॥ व जंवर म॥ हे कांही उतम वर्तणुक करीत नांही गोसांवियेंही त्याचे यातीमध्यें त्या हर दोजणांस सिष्ट करुन ठेविले असतां ये जातीची वर्तणुक करुन कांही येक गोसांवियांचा कायेदा लागला आहे तोही मध्येंच घेऊन कांही दृश्ये केला तर केला नाहीं तर अगदीच भक्षितात आणि मनांवर त्या चार गोष्टी मनास माने तैशा युक्तीने सजोन गोसांवियासि लिहून पाठऊन आपला मुजरा करुन घेतात आणि ये जागां तों वर्तणुक ये जातीची करितात त्यास गोसांवीहीं त्यांचे येथार्थ मानून चेऊल प्रांतेचे जे कोण्हीं ये जागां आहेत गोसांवियांची आज्ञा मानितात त्यांजवरी उफराटें गोसांवी अवकृपा करुन त्यापैकीं कानां झिराडकर व काला बेलकर यांसी यातीवेगलें केलें म्हणौन परस्परें आइकोन आश्चिर्ये दिसोन आलें वरचील त्यांचा तों कांही अपराध नांही चेऊलकर व आणखी येकूण पना पाउणसें येकमतें होऊन काना झिराडकर व काला बेलकर यांस फुडें केलें आहे हे सात पांच वेलां आम्हांजवल आले होते यांचें मानस आपले यातीचा बंद राखावा तिलतुल्ये अनुचित पदार्थ होऊ नेदावा जो यातीमध्यें घ्यावयाचा तो सर्वांचे मतें घ्यावा नेघावयाचा तो नेघावा अनराहाटी वर्तणूक होऊं नेदावी यैसा नीतीपदार्थ म्हणतात म्हणून सदरहु झोल म॥ व जंवर म॥ यांचे चितास येत नांही याकरितां त्यांची गैरवाका माळुमाती गोसांवियांसि लिहून त्यांस बदलाम केलें आहे वरचील झोल म॥ व जंवर म॥ हे तों आपले ढंग सांडीत नांही येही मागां कितेक अनुचित गोष्टी केल्या आहेत व पुढेंही यास सळुग दिल्हेयाने आपल्या कर्तव्यास चुकण्हार नांही त्यास मर्‍हाष्ट यातीचा बंद राखावा अनुचित पदार्थ होऊ नेदावा हें भल्यास विहित आहे जाणौन ये गोष्टीचा अभिमान धरुन पारपत्ये करणें गोसांवियांसि उचित आहे येण्हेकरुन पुण्येपुरुषार्थ आहे यिविषईचे खागरीकुणबीसमुदाव मिलोन साकल्ये गोसांवियासीं विनतीपत्र लिहिलें आहे तेण्हेप्रमाणें मनास आणून पारपत्ये केलें पाहिजे यानंतर गोसांवियांसी आपली आज्ञा मुबैत चालवणें असल तर याउपरचे खागरीकुणबियांचे यातीची हर येक गोष्ट पुढें लिहिणें तर इतकियांचे यावें पत्र लिहून आम्हाकडे रोखा पाठवणें बीत॥
तानकोजी छत्रे १
बाल घरत राम घरत मुलेकर १
कालोजी पाटेल बेलकर १
हिरोजी आंघवसकर १
सदरहु चौघां जणांचे नावें रोखा लिहुन पाठवीत जाणें येण्हेंकरुन पुढे अनुकूल चालेल कललें पाहिजे [कृ]पा निरंतर असों दीजे र॥ माहे कार्तिक सुद १३ भौमवार [नि.] हे विनती
पौ छ ११ रबिलौवल सु॥ आर्बा तिसैन आलफ सके १६१६ श्रीमुख नाम सवंसरे कारतीक सुद १३ सोमवार (?) माहे

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP