मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ८१

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८१

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


म्हणोनि द्विवार सांगति । भक्तिचें श्रेष्ठत्व प्रतिपादिती । भक्तीवीण नव्हे प्राप्ति । ऐसा जाणा निश्चय ॥११३३॥
भक्ति म्हणजे परमप्रीति । अखंड स्मरण ध्यानीं रति । देहीं असोनि विदेह स्थिति । अनुभवासी येईल ॥११३४॥
मुक्तीवरील भक्ति जाण । अखंड मुखीं नामस्मरण । हेंचि जीवन्मुक्त लक्षण । सकल संतीं अनुभविलें ॥११३५॥
आतां हेचिं भक्तिसाधन । अखंड स्मरण आणि ध्यान । एकादश प्रकारें विवरून । दविती सूत्रीं पुढील ॥११३६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP