मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ११ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ११ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ लोकवेदेषु तदनुकूलाचरणम ॥ ॥ तद्विरोधिषूदासीनता च ॥११॥ Translation - भाषांतर लौकिक वैदिक आचरणीं । ईश्वराज्ञा प्रमाण मानोनि । सदा वर्तति निर्भयपणीं । निरलसपणें निरंहकार ॥१६२॥ईश्वर आज्ञा ती कोण । केंवि मानावी प्रमाण । धर्मग्रंथी लिहिलें जाण । तेचि आज्ञा ईश्वराची ॥१६३॥प्रथम वेदश्रुति प्रमाण । तयावरी शास्त्रानुशासन । सर्वांवरी संतवचन । प्रमाण अखिल कार्यार्थीं ॥१६४॥भाविक असतील जे जन । ते सत्वरीं श्रद्धा ठेवून । उध्दरती आपणालागून । सवें घेऊनि आणिका ॥१६५॥कुर्तकीं दांभिक पाषांडी । जयांची मति झाली वेडी । तयांची विरोधावरी आवडी । परमार्थ न रुचे तयांसी ॥१६६॥स्वार्थी दृष्टि अनिवार । विषयावरी पडिभर । केवळ भोगैकतत्पर । होऊन राहिले असती ॥१६७॥बहिरंगदृष्टि तयांची । जाणीव नाहीं स्वहिताची । आसक्ति क्षणिक सुखाची । तेणें जाती अधोगती ॥१६८॥तयांचा संग धरावा । अथवा विरोधही न करावा । उदासीनपणें पहावा । खरा खोटा निर्णय ॥१६९॥कोणासीही भांडीं नये । नादीं कोणाच्या लागों नये । श्रध्दा आपुली सोडू नये । परिणामी कळों येईल ॥१७०॥अकाली पाऊस पडला । ओढीयीसी पूर आला । थेंव नाहीं डोळियाला । परतोनि पाहतां लावावया ॥१७१॥तैसें दांभिकाचें वैभव । अथवा पाखांड्याचें गौरव । जरी दिसों आले सावेव । तरी अवघे क्षणिक ॥१७२॥म्हणोनि तयावरी न भुलावें । बुध्दीसी चळों न द्यावें । श्रुति संतां अनुसरावें । सर्वभावें आपण ॥१७३॥ईश्वर सर्वाचें हृदयीं । नास्तिक पाखांडियांचे ठायीं । सद्भुद्धि देवो लवलाहीं । उध्दाराकारणें तयांच्या ॥१७४॥ऐसें तयासी विनवावें । वादावादी न पडावें । कोणी पुसिलें तरी बोलावें । एरव्ही मौन उदासीन ॥१७५॥ N/A References : N/A Last Updated : November 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP