श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५०
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
तोचि एक म्हणति तरला । निश्चयें जाण उध्दरला । इतरांही तारावया झाला । स्वयें आपण तारक ॥५२३॥
अद्भुत महिमा भक्तीचा । न वर्णवे इया वाचा । सकल जनोध्दाराचा । मार्ग झाला मोकळा ॥ ५२४॥
योगी तरी स्वयें तरती । कर्ममार्गी स्वर्गा जाती । ज्ञानी आपण स्वयें होती । नये देतां अनुभव ॥५२५॥
परि भक्तांचिये संगतीं । अनेक भक्त निर्माण होती । स्वयें तरोनि तारिती । सामान्य जनां सकळां ॥५२६॥
आजवरी असंख्यन । भक्तिमार्गासी अनुसरून । पावले परमपद निर्वाण । याचि देहीं सत्संगें ॥५२७॥
सत्संग आणि नामस्मरण । हें दोनीचि उपाय कारण । व्हावया मायेचें निवारण । भगवत्प्रेममूलक ॥५२८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP