मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


पराशरसुत व्यास मुनि । म्हणति पूजा करावी एकमनीं । शुध्दभाव मनीं धरोनि । षोडशोपचारसहित ॥२१०॥
भगवंताचें करावें ध्यान । मंत्रपूर्वक आवाहन । तैसेचि द्यावें आसन । पाद्यपूजा करावी ॥२११॥
शुध्द उदक आणोन । घालावें मंगलस्नान । गंधाक्षता सुमनें वाहून । धूप दीप अर्पावा ॥२१२॥
सव्य प्रदक्षिणा करोनि । अंग लोटावें नमनीं । अर्पावा नैवेद्य सुलक्षणी । मंत्रपुष्पें वाहावीं ॥२१३॥
इतुकेंही केलियावरी । न मम म्हणावें अंतरीं । कर्ता करविता श्रीहरी । शरण तयासी रिघावें ॥२१४॥
कर्म करोनि ब्रम्हार्पण । हेचिं भक्तीचें मुख्य लक्षण । सर्व कमीं अंत:करण । संलग्न असावें ईश्वरीं ॥२१५॥
ईश्वर सर्वांठायी अभिन्न। जरी विश्वाकारें दिसे भिन्न । सर्वत्र त्यासी अवलोकून । राहावें अलिप्त संसारीं ॥२१६॥
त्याची आठवण राहावी । म्हणोनि नित्य पूजा करावी । मूर्ति ध्यानीं धरावी । जंव दिसों लागे सर्वत्र ॥२१७॥
ऐसा संकेत पूजेचा । आपुल्या उपास्य देवतेचा । संतोष होईल जेणें साचा । तैसा उपाय करावा ॥२१८॥
यथा देहें तथा देवें । ऐसें वर्णावें स्वभावें । तैसेचि आपण आचरावें । स्निग्ध मन करोनि ॥२१९॥
ऐसी पूजा केलिया । चित्त चिद्रूपीं जाय लया । भक्तिलक्षण बोलिजे तया । श्रीमद्व्यासमतानुसारें ॥२२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP