मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भगवदभक्ति नव्हे सकाम । कामनेचा तेथें विराम । आत्मारामावांचून काम । उपजों नेणें सर्वथा ॥११५॥
विषय काम उपजला । तरी राम हातिंचा गेला । राम हृदयीं राहिला । तेथें वाताहात विषयांची ॥११६॥
विरक्तिवांचून भक्ति नाहीं । भक्तिवांचून विरक्ति नाहीं । भक्ति विरक्ति एके ठायीं । नांदो लागती साचार ॥११७॥
एकचि विषय एके ठायीं । राहे तेथ आन नाहीं । ऐसा निसर्गाचा नियमचि पाहीं । दिसों येतसे सर्वत्र ॥११८॥
भांडियामाजीं भरिलें जीवन । तरि तें रितें केलियाविण । साठवितां नये दुग्ध लवण । तैसेंचि जाण मनाचें ॥११९॥
मन भगवतप्रेमें भरलें । तेथें विषयांचे काय चाले । बाहेरचें बाहेरीचि राहिलें । नाहीं रिगमू अंतरीं ॥१२०॥
या लागीं निरोध रूपत्व । भक्तिमार्गाचें मुख्य तत्व । बाह्य विषयांचे आप्तत्व । नाहीं तेथें अणुमात्र ॥१२१॥
निरोधाचे प्रकार दोन । लौकिक वैदिक कर्म निरसन । त्याचेंही स्पष्ट निरूपण । सावधान परियेसा ॥१२२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP