मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ३६ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३६ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ अव्यावृतभजनात ॥३६॥ Translation - भाषांतर मनाचा स्वभाव मनन । कांही तरी नित्य चिंतन । करीत राहे तेणेंविण । असतांचि नये तयासी ॥३५८॥विषयचिंतने विषयाकार । होऊनि राहे निरंतर । विषयलोभ उपजवीं अपार । भोगकर्दभीं लोळवी ॥३५९॥नाना आपदा भोगवी । दुर्गतिमाजी सांपडावी । अंति नरकाची वाट दावी । दुर्निवारपणें दुर्घट ॥३६०॥विषयचिंतनाचें निवारण । व्हावयालागीं ईश्वरस्मरण । साधुसंतीं प्रतिपादिलें जाण । ईश्वरही स्वयें बोलिलें ॥३६१॥तस्मात् सर्वेषु कालेषु । हरिचिंतन करी विशेषु । स्वकर्तव्याचा आळसु । कहीं न केला पाहिजे ॥३६२॥अखंड चिंतन ईश्वराचें । नयनीं श्रोत्री ध्यान त्याचें । अंतर्बहिर्मनोवाचें । न विसंबावें तयासी ॥३६३॥विषयांसी इयापरी । हरिरूप करणें निर्धारीं । चिंतनें चिंतनें साक्षात्कारीं । चढिजे दृढ अभ्यासें ॥३६४॥ऐसे हें अखंडित भजन । सर्वकाळ हरिस्मरण । निर्विषयत्व व्हावया कारण । साधन दुसरें बोलिलें ॥३६५॥परि हें साधन ज्याचें त्यासी । करणें न कळत कोणासी । वृत्ति पावूनि निवृत्तिसी । परम पदा पाववी ॥३६६॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP