मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तिशास्त्राचें श्रवण । नित्य करीत राहावें मनन । तेणें होय निजध्यासन । लाभे ईश्वर साक्षात्कार ॥९०५॥
भक्तिशास्त्र जें म्हणितलें । तें भगवदवचन जाणा भलें । किंवा सत्पुरुषांनी जें कथिलें ।
ते परमाआदरे श्रवण करा ॥९०६॥
श्रवण चालिलें पाहिजे सतत । तेणें अंत:करण शुध्द होत । नाना विकल्प मनीं वावरत ।
ते झडोनि जाती तात्काळ ॥९०७॥
श्रवण केल्या पापें जाती । मनाची होय उन्नति । बुध्दि स्थिर होय निश्चिति । पावन करी सर्वांग ॥९०८॥
जें जें कांही कानी पडले । तयाचें मनन पाहिजे केलें । ऐकिल्याप्रमाणें वागों लागलें । पाहिजे नियमपूर्वक ॥९०९॥
आपुलिया मनाची शुध्दि । आपणचि करावी विवेकबुध्दि । सत्यासत्य निर्णय आधीं । आपुला आपण करावा ॥९१०॥
येथ इतरांचे नाहीं प्रयोजन । शत्रु मित्र आपुला आपण । आपणचि आपलें संशोधन । करितां होय कार्यसिध्दि ॥९११॥
म्हणोनि धर्मशास्त्राचें श्रवण । करावें भक्तिमार्गाचें विवंचन । शास्त्रशुध्द आचरण । सर्वकाळ साधावें ॥९१२॥
भक्तिज्ञानासी उद्बोधक । कर्में करावीं शुद्धिकारक । भजन पूजन कीर्तन आवश्यक । नित्य करीत असावें ॥९१३॥
सर्व शास्त्रांचा सिध्दांत । हाचि बोलिला मतितार्थ । भगवदस्मरणा वांचोनि व्यर्थ । काल जावों न द्यावा ॥९१४॥
काल तोचि ईश्वर जाण । तें आपुलें श्रेष्ठ धन । तें वेचितां वायावीण । हानि होईल आपणां ॥९१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP