मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ५१ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५१ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम् ॥ ५१॥ Translation - भाषांतर भगवत्प्रेम अनिर्वचनीय । तयाचें वर्णन करावें काय । बोलों जातांही बोलों नये । तेंचि स्वरूप तयाचें ॥५२९॥नये बोलतां सांगतां । तयाचें चिन्ह नये दावितां । नये हातें घेतां देतां । अनुवादितां कवणाही ॥५३०॥वर्णनासी विषय होय । तरी तें द्वैताश्रित होऊनि ठाय । अद्वैत समाधानाची सोय । लाभे तेथ अनुभवें ॥५३१॥प्रेम तेंचि परब्रम्ह । ब्रह्म तेंचि परमप्रेम । प्रेम आणि परब्रम्ह । एके ठायीं निवासु ॥५३२॥प्रेम कशानें भंगेना । शस्त्रादिकी तुटेना । जळामाजी बुडेना । वन्हि दाहक नव्हे तया ॥५३३॥विषयांचे प्रेम सकाम । भगवत्प्रेम तें निष्काम । स्वानिभवें आत्माराम । पदवी पाववी निश्चित ॥५३४॥विषयप्रेम नाशिवंत । जीवांचा नित्य करी घात । भगवत्प्रेम अविरत । शाश्वत सुखासी पाववी ॥५३५॥द्वैतसंबंधी विषयप्रेम । होय आत्मयासी श्रम । सकल प्रपंचाचा होय विराम । तें भगवत्प्रेम वोलिलें ॥५३६॥सर्वोतर्यामीं श्रीहरी । नित्य सुखरूप चराचरी । नांदुनि राहिला आंत बाहेरी । अनुभवरूपें प्रत्यक्ष ॥५३७॥त्याचें वर्णन काय करावें । अनुभव घेऊन पाहावें । अनुभवितां होऊनि जावें । तेंचि स्वयें आपण ॥५३८॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP