श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३४
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
आचार्य म्हणावा तो कवण । जो शास्त्रार्थ जाणे आपण । इतरांसीही जाणवी पूर्ण । स्वयें आचरण करोनि ॥३३३॥
भक्तिशास्त्र जो स्वयें जाणे । इतरांसी जाणवी खुणे । तैसेचि आचरण पूर्णपणें । जयाचे ठायीं बाणलें ॥३३४॥
तोचि अधिकारी बोलावयासी । साधन निरूपण करावयासी । त्यांचे मतें साधनें कैसीं । भक्तिची ते श्रवण करा ॥३३५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2015
TOP