मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ३८

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३८

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भीति उपजावया साधन । मुख्यत: सत्संगचि कारण । तेणें होय भगवददर्शन । जें उपजवी भक्तितें ॥३८४॥
संतकृपेनें ईश्वरप्राप्ति । ईश्वरकृपेनें संतसंगति देहींचा मेळ होतां निश्चिती । भक्ति लाभें अनयासें ॥३८५॥
संतासी देखतां संतपण । प्रकटे अंतरीं आत्मखूण । संगतीनें संतगुण । सहज उपजती स्वभावें ॥३८६॥
संताची भेटी व्हावया । ईश्वरसेवा लागे करावया । सेवा करितां पोटीं दया । त्यासी उपजे निश्चित ॥३८७॥
तो कृपाधन करुणामूर्ति । जाणोनि निजभक्ताची आर्ति । सेवेची करावया पूर्ति । गांठ घाली भक्ताची ॥३८८॥
स्वयें तो जरी अबोलणा । तरी दीन जन दु:खशमना । बध्द परिकर होवोनि जाणा । तात्काळ संकट निवारी ॥३८९॥
ज्यासी ज्यासी जे कामना । ते ओळखोनि तत्क्षणा । सत्वर करी उपाययोजना । ऐसी कृपा तयाची ॥३९०॥
अर्थार्थीं जिज्ञासु आणि आर्त । ऐशा विविध कार्यार्थ । अवतार लीला जो दावित । तोचि ईश्वर म्हणावा ॥३९१॥
तयाची कृपा झालियावरी । संत भेटती सत्वरीं । संतकृपेनें तो श्रीहरी । होय ओळगण भक्तांचा ॥३९२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP