श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५८
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
भक्तिमार्ग सुलभ बहुत । कांही करावें नलगे तेथ । नाना साधनांची यातायात । नलगे कष्ट सोसावे ॥६३८॥
ठायीच बैसोनि राहावें । मन एकाग्र करावें । भगवंताचें स्मरण ठेवावें । सर्वकाळ मानसीं ॥६३९॥
बाह्यउपचार सामुग्री । नलगे करावी तयारी । सर्व भार देवावरी । टाकून असावें निश्चिंत ॥६४०॥
ऐसी ही भक्ति सुलभ । स्वयंभ आणि स्वप्रभ । स्वसामर्थ्यें ज्ञानलाभ । करून देत जगासी ॥६४१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP