श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २५
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
कर्मज्ञान आणि योग । ईश्वरप्राप्तीचे तिन्ही मार्ग । अधिकारपरत्वें लाग । घडतसे तयांचा ॥२७३॥
ज्ञानमार्गासी बुध्दिबळ । योगासी शरीरबळ । कर्ममार्गासी निष्ठाबळ । अवश्य लागे असावें ॥२७४॥
परि सर्व बळामाजी बळ । मुख्य पाहिजे भक्तिबळ । ईश्वरावरी प्रेम अढळ । असेल तरीच कार्यसिध्दी ॥२७५॥
भक्तीनें भूषण कर्मासी । भक्ति शोभवी ज्ञानासी । भक्तिवांचून योगासी । निष्फलता बोलिली ॥२७६॥
यालागीं भक्ति श्रेष्ठ सर्व मार्गाहूनि वरिष्ठ । साध्य साधना एकवट । ठायीचं करूनि राहिली ॥२७७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 16, 2015
TOP