मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ६३ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६३ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ स्त्रीधननास्तिकचरित्रं न श्रवणीम ॥६३॥ Translation - भाषांतर आतां या भक्तिमार्गासी । अपायकारक कोण कैसी । तेंही जाणिलें पाहिजे ऐसी । आकांक्षा धरोनि बोलती ॥६८१॥सद्वैद्य औषध देती । परी पथ्यही सांगोनि ठेविती । पथ्य पाळिल्या गुण निश्चिति । अनुभवा ये तमाच्या ॥६८२॥तैसेचिं येथेंही आहे । उदंड भक्ति जरी लाहे । तरी शुध्द आचरणावीण नये । कांहीच येत प्रत्यया ॥६८३॥हरिचिंतन सत्संगति । सर्वत्र भगवदस्वरूप ख्याति । हे औषधापरि बोलों येती । परी पथ्य पाळिलें पाहिजे ॥६८४॥वावडें काय तें जाणावें । जाणोनि नित्य टाळावें । तरीच तें अनुभवावें । फळ केल्या कार्याचे ॥६८५॥यालागीं तें निरूपिति । विघ्न टाळावया निश्चिति । स्त्रीधन नास्तिक संगति । साधकानें वर्जावी ॥६८६॥त्याचें घेवों नये दर्शन । न करावें चरित्र श्रवण । तेथें मन वेधिल्या जाण । नये हातीं आपुल्या ॥६८७॥या तिहीमाजीं प्रथम । स्त्रीविषय बहु दुर्गम । चेतवूनि क्रोध काम । घातक होय आपणा ॥६८८॥इतर विषय आहाति । परि एकेक इंद्रियासी लोभवति । सर्वेंद्रियासी गोवती । ऐसें बळ नाहीं तया ॥६८९॥स्त्रीविषय जरी एकला । तरी सर्व इंद्रियांसी चटावी भला । प्राणी एकदां वश झाला । कीं तो गेला रसातळीं ॥६९०॥स्त्रीसंगतीनें नाश । झाला आजवरी बहुतांस । कर्मठ ज्ञानी योगीजनास । हाचि झाला बाधक ॥६९१॥विश्वामित्र पराशरादिक । यांसी स्त्री झाली घातकारक । तपश्चर्या आणि विवेक । यांसीं केलें देशोधडी ॥६९२॥आणिकही थोरथोर । नागविले अधिकारी नर । तेथ इतर सामान्य येर । कोण पुसे तयांसी ॥६९३॥यालागीं साधकानें । फार जपूनि वागणें राहाटलिया गाफिलपणें । नाश असे ठेविला ॥६९४॥स्त्रीचरित्र नायकावें । त्यांसी डोळां न देखावें । संभाषण तेंही वर्जावें । एकांतीं आणि लोकांती ॥६९५॥ईषत् प्रसंग घडों येतां । भोगार्थ वाढे लंपटता । मनीं लोभ धरूं जातां । अध:पात चुकेना ॥६९६॥परस्त्री आणि परधन । जो मानी विषासमान । तोचि जगीं धन्य जाण । करील सार्थक जन्माचें ॥६९७॥द्रव्यलोभ बहु कठीण । आवरीतां नावरे जाण । प्राण देती घेती त्यालागून । निर्घृणपणें अविवेकी ॥६९८॥द्रव्य जोडिल्या सर्व जोडे । जवळी नसतां पडे उघडे । यालागीं जिकडे तिकडे । पाहातां खटपट त्यासाठीं ॥६९९॥द्रव्यावांचूनि निभेना । त्याविरहित कांहीं जुळेना । द्रव्य असल्याविण चालेना । संसारयात्रा कोणाची ॥७००॥द्रव्य तें अवश्य संग्राह्य । सर्वाचीच जरी होय । तरी अन्यायानें करितां संचय । हित नव्हे आपणा ॥७०१॥स्त्रिया आणि धन । यांचें स्वधर्में करावें संपादन । रक्षण आणि परिपालन । स्वधर्मेंचि बोलिलें ॥७०२॥अन्यायनें मिळवूं जातां । करी अपाय तत्वतां । यालागीं तेथील वार्ता । सज्जनीं मनीं नाणावी ॥७०३॥परमार्थासी साधन धन । परि तेंचि साध्य मानितां क्षण । सकल परमार्थ बुडवून । करी राखरांगोळीं ॥७०४॥म्हणोनि दूर राहावें । तयाचें भरी न पडावें । कुणीहीं पडों न द्यावें । स्त्रीधन चरित्र साधकीं ॥७०५॥तैसेचि नास्तिकापासून । दूर राहावें जाणून । संगतिनें तयाचा गुण । लागल्याविण राहीना ॥७०६॥चुकूनि जरी संभाषण । कानीं पडले तरी जाण । विकल्प मनीं उपजल्यावीण । न राहे होय घातक ॥७०७॥साधकाचें कोमल मन । बिघडवितां नलगे क्षण । शुध्द भाव होय मलीन । क्षण एक न लागतां ॥७०८॥विकल्प मनीं उपजला । तरी तो न वजे दवडिला । कुंठित करूनि बुध्दि सकळा । भ्रांतिमाजी पाडील ॥७०९॥वृक्षाचा कोमल अंकुर । सहज खुडताये सत्वर । तोचि वृक्ष होता थोर । मत्त गजाही नाटोपे ॥७१०॥तैसे साधक स्थितीत असतां । बुध्दिसि न राहे स्थिरता । सहज संशय मनीं येतां । तोचि राहे स्थिरावोनि ॥७११॥म्हणोनि साधकाचे चित्तीं । राहे अपरिपक्व बोधस्थिती । ते नास्तिकांचि ये संगति । नाश करील तयाचा ॥७१२॥नास्तिकांसी नाहीं प्रमाण । वेदशास्त्र पुराणवचन । सत्संगति विषासमान । मानुनि निंदा करिताती ॥७१३॥स्वयें आपण बुडती । इतरांसीही बुडविती । अंधतम नरकगति । भोगूनि इतरां भोगविति ॥७१४॥ऐसा हा थोर कठीण । परिणाम घडे दारुण । यालागीं चरित्र श्रवण । नास्तिकांचें वर्जावें ॥७१५॥तयांसी न करावें भाषण । नाइकावें तयाचें वचन । तयांचा संबंध टाळून । दर्शनही न करावें ॥७१६॥जोंवरी दृढ निश्चय नाहीं । तोंवरी दूर राही । निश्चय बाणतां आपुल्या ठायीं । काय करील नास्तिक ॥७१७॥तैसेचि असे स्त्री आणि धनाचें । मन मोहिती साधकाचें । दूर राहणें तें हिताचें । कल्याणकारक सकळां ॥७१८॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP