मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ४६ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४६ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ कस्तरति कस्तिरति मायां य: संगास्त्यजति यो महानुभावं सेवते निर्ममो भवति ॥४६॥ Translation - भाषांतर माया म्हणावी ते कैसी । जे नसूनि सर्वाते ग्रासी । बुडतां बुडवी जीवासी । संसार घोर समुद्रीं ॥४४२॥माया तेचि कल्पना । कल्पनेने संसार रचना । खरी करूनि दाविली जनां । मुळीं नसतां काहींचि ॥४४३॥कल्पनेपासूनि झाला । जगदभ्रम रूपासी आला । कल्पनाचि आधार त्याला । मिथ्या मोह उपजवी ॥४४४॥सया कल्पनेविरहित झाला । किंवा मायेपासूनि सोडविला । ऐसा नाहीं कोठें देखिला । संसारी जीव ॥४४५॥परि ते झालियावीण । नव्हे शाश्वत समाधान । यालागीं सांगति साधन । उपाय परोपरीचे ॥४४६॥प्रथम करावा संगत्याग । त्यानंतर बोलिला सत्संग । ममता टाकून व्हावें अलग । तरीच माया निरसेल ॥४४७॥आत्मा स्वरूपत: असंग । परि नेणातियांसी देहसंग । होतांचि ओढवला प्रसंग । दारूण संसार यातनेचा ॥४४८॥देहात्मबुध्दि जे जडली । तेणें डोळियां झांपड आली । देखत देखत भुली पडली । कर्तव्याकर्तव्याची ॥४४९॥आत्म्यासी आपलें विस्मरण । हें मूळ मायेचें लक्षण । तेणें दृढ संसारबंधन । बांधोनि घाली जीवासी ॥४५०॥हें माझें तें माझें । डोईवर घेतलें ओझें । तेणें कष्टी झाले सहजे । आपआपणा विसरोनि ॥४५१॥गृहदारा पुत्र मित्र । धनसंपत्ति इहपरत्र । भोगसामुग्री रचितां विचित्र । आसक्त केलें सर्वासी ॥४५२॥तो संग आधीं सांडावा । तरीच मोक्ष पावावा । विषयसंगतिचा गोवा । बिकट आहे ॥४५३॥विषयसंगतिनें विषयध्यान । जडोनि राहे परिपूर्ण । तेंचि पतनासी कारण । जन्ममरण भोगवी ॥४५४॥विषयांपासोनि सोडवण । करितील संतसज्जन । यालागीं त्यांचे चरण । नित्य सेवित रहावें ॥४५५॥संतसंगति करितां । उपदेशाचें श्रवण घडतां । हे माया मोह सरिता । आटूं लागे सत्वर ॥४५६॥संतसेवा करितां । सहज अनुभव ये हातां । दु:ख शोक मोहवार्ता । दरी पळे ॥४५७॥माया म्हणजे ममता । हातीं नसोनि मिरवी सत्ता । पदार्थमात्रीं आसक्तता । तेंचि मूळ दु:खासी ॥४५८॥स्त्री पुत्र गृह धन । हें तो सर्व ईश्वराधीन । असोनि त्यावरी जडलें मन । माझें माझें म्हणविती ॥४५९॥परि माझें ऐसें काहीच नाहीं । ईश्वरनिर्मित सर्व काही । ऐसे जाणे जो लवलाहीं । तोचि तरेल भवनदी ॥४६०॥सकल सत्ता ईश्वराची । निर्माण करी सर्व तोचि । ऐसें जाणोनि ममत्वाची । ग्रंथी ज्यानें तोडिली ॥४६१॥तोचि तरेल भवार्णवीं । ईश्वरार्पणें धन्य पदवी । पावूनि जन्ममरणाच्या चुकवी । यातायाती सकळ ॥४६२॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP