मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


जारप्रेमाचें ठायीं । विषयसुखावाचूनि नाहीं । सुखभोग आपुलिया ठायीं । जार केवळ निमित्तमात्र ॥२६४॥
तो जरी सुख न देतां । तरी प्रेमाची दूर वार्ता । तोचि दु:ख देऊं लागतां । प्रेम विरघळे तात्काळ ॥२६५॥
जारावरी प्रेम करिती । किंचित काल आराधिती । पाठीं तयासीच वधिती । प्रतिकूल वाटों लागतां ॥२६६॥
जारजरिणीचें प्रेम । तो केवळ विषयभ्रम । अंतीं नरकवास दारुण । भोगितां कांहीं चुकेना ॥२६७॥
जारासाठीं जारावरी । प्रेम कोणीही न करी । सर्वांचें प्रेम आपणावरी । आपणालागीं प्रिय सर्व ॥२६८॥
दुसर्‍याचें सुखें सुखी होणें । देहसुखासी तुच्छ लेखणें । हीं तो तत्वज्ञांचीं लक्षणें । असामान्यपणें नांदती ॥२६९॥
गोपिस्त्रियांची ऐसी स्थिति । कृष्णसुखें सुख मानिती । विषयभोगाची खंती । नाहीं चित्तीं अणुमात्र ॥२७०॥
कृष्ण परमत्मा परंज्योती । त्याची अंतरीं जडली प्रीति । त्याच्या सुखें सुखी होती । भोगेच्छा संपूर्ण निमाली ॥२७१॥
यालागीं जारप्रेम म्हणों नये । आत्मारामीं जडली सोय । नित्य कृष्णस्वरूपीं तन्मय । होऊनि त्या राहिल्या ॥२७२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP