मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ३७ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३७ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ लोकेऽपि भगवद्गुणश्रवणकीर्तनात ॥३७॥ Translation - भाषांतर यावरी साधन जें तिसरें । तें निरूपति प्रेमभरें । भगवदभजनकीर्तन पुरे । लौकिक मतें प्रतिपादिती ॥३६७॥भगवंताचें गुण गावे । भजनकीर्तनीं रमावे । सर्वांनी मिळून आचरावें । ऐसा मनीं संकेत ॥३६८॥एकाचें पाहून दुसर्यासी । सदबुध्दि उपजे भरवंसी । सर्व जनोध्दारासी । हेंचि प्रमाण सर्वांशी ॥३६९॥ईश्वराचें गुणगान । सर्वांसी वेध लावून । पापपुण्याची निवड करून । सदाचारी प्रवर्तवी ॥३७०॥मनुष्यप्राणी समाजप्रिय । त्यासी संगतिवीण राहों नये । संगतिचि कारण होय । सद्गति अथवा दुर्गतिसी ॥३७१॥ज्यासी जैसीं आवडी । तैसीचि संगती तो जोडी । संगतिनें घडोघडी । वाढे आवडी सर्वकाळ ॥३७२॥भगवतभक्ताचे संगतीं । भजनकीर्तनी उपजे प्रीती । सज्जन दुर्जन तेही मिळती । एकया ठायीं सहज ॥३७३॥लहान थोर वृध्द तरुण । अज्ञान सज्ञान सर्व मिळोन । भगवदकीर्तनीं सप्रेम होऊन । भक्तिसुखें उंचावती ॥३७४॥कीर्तनीं वेध सर्वांसी । हारवोनी चिंता भयासी । क्षणैक तन्मयता त्यांसी । होय श्रवणकीर्तनें ॥३७५॥एकदां श्रवण केलिया । मन लोभूनि त्या ठायां । पुन: पुन्हा श्रवण कराया । प्रवृत्त करी सर्वांसी ॥३७६॥विषयाचें सुख निमिषमात्र । कीर्तनें सुख लाभे सर्वत्र । गोडी लावून करी एकत्र । इंद्रिय मनोबुध्दिसी ॥३७७॥एकाचे संगती अनेक । तरती सकळ जनलोक । प्रसंग तरी तात्कालिक । परिणाम उपजवी शाश्वत ॥३७८॥कीर्तनें उपजे भगवत् प्रेम । जीवासी करी निष्काम । निष्काम तोचि आत्माराम । लागे स्वरूपीं ॥३७९॥ऐसें सहज घडे साधन । लौकिक व्यवहार न सांडून । मोक्षद्वार खुलें करून । सकळ जनां उध्दरीं ॥३८०॥परी संत कृपेवीण । कही न घडे भजन कीर्तन । त्यांचे संगति लाभे पूर्ण । परमार्थ निजठेबा ॥३८१॥त्यांचे चरण रज:कण । माथां पडतील तरी जाण । भवभयांचे विध्वंसन । निर्भयता होय सर्वोसी ॥३८२॥यालागीं संतसंगति । चौथें साधन प्रतिपादिती । ईश्वरकृपेनें जे लाह्ती । तेचि म्हणों सदैव ॥३८३॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP