मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ४२

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४२

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


यालागीं हरीभक्ति । भजनकीर्तनी आसक्ति । अखंड नामस्मरणाची प्रीति । साधित साधित साधावी ॥४१२॥
तेणेचि होय सर्व साध्य । अगस्य तें होय गम्य । न लभे तें होय लभ्य । ऐसें साधन वरिष्ठ ॥४१३॥
जैसें बीज आलिया हातीं । समग्र वृक्षाची होय प्राप्ति । कां उद्यान आलीया जवळी । फळां पुष्पां सुकाळ ॥४१४॥
तैसी श्रीहरि गुरुकृपा । हाचि सिध्दपंथ सोपा । अनुसरोनि चुकति खेपा । जन्म आणि मरणाच्या ॥४१५॥
यालागीं तेंच एक साधावें । ऐसें द्विवार सांगितलें स्वभावें । ब्रम्हकुमार नारददेवें । आतां पुढें अवधारा ॥४१६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP