श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३१
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
कां जे भक्ति तेंचि ज्ञान । ज्ञान तेंचि भक्ति पूर्ण । स्वानुभवें पडिलें शून्य । ज्ञान भक्ति पदार्था ॥३०९॥
साखर आणि गोडी । शब्द मात्र परवडी । मुखीं न पडतां ते घडी । शीण मात्र वाचेना ॥३१०॥
जैसें राजमंदिराचें दर्शन । किंवा मिष्टान्नभोजनाचें वर्णन । सुख नेदी पाहून ऐकून । प्रत्यक्ष लाभ न घडतां ॥३११॥
दुरून राजवाडा पाहिला । परि भेटीचा योग नाहीं आला । तरी लाभ कांहीं नव्हे त्याला । राजदर्शन न घडतां ॥३१२॥
राजाची भेटी होईल । तरीच दारिद्रय दु:ख हरेल । तैसी ईश्वराची भक्ति जडेल । तरीच होईल समाधान ॥३१३॥
अथवा मिष्टान्नभोजनाची वर्णनें । जरी किती ऐकिलीं एकाग्र मनें । तरी क्षुधा निवारण नोहे त्यानें ।
ग्रास मुखीं न पडतां ॥३१४॥
तैसी ब्रह्मज्ञानाचीं व्याख्यानें । अमुप केलीं पुराण श्रवणें । तृप्ति नव्हे कधीं त्यानें । आत्मखुण न बाणतां ॥३१५॥
जैसा राजा प्रसन्न होण्यास्तव । त्याचें दर्शन अवश्यमेव । घेणें लागे येर उपाय । व्यर्थ सर्व बहिरंग ॥३१६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 16, 2015
TOP