श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४५
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
कामक्रोध मोहादिक । हृदयामाजी स्वाभाविक । दुष्ट संगतिनें अधिक । फोफावुनि बुडविती ॥४३६॥
हे सर्वांचिया अंतर्यामी । वृत्तिरूपें त्या अनंत ऊर्मी । हेलावती विविधकामीं । तेणें मन अनावर ॥४३७॥
अग्निसी इंधन मिळतां । जैसा वाढों लागे सत्वरता । तैसा वासनेसी विषय जोडतां । विचारातें लोपवी ॥४३८॥
विवेकहीन होतांक्षणी । विकाराची झडपणी । तेणें होय सर्व हानि । हा निश्चय जाणावा ॥४३९॥
दुष्ट संगतिनें ऐसें घडे । विवेकाचा मार्ग मोडे । साधन नौका सहज बुडे । घोर अविद्या सागरी ॥४४०॥
आतां या संसारसागरांतून । कोण तारील मजलागून । ऐसा प्रश्न उपस्थित करून । देती उत्तर तें ऐका ॥४४१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP