मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २३

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २३

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


त्यासी नाहीं पापपुण्य । लौकिक दर्शन अदर्शन । मीतूंपणाची बोळवण । आपैसया जाहली ॥ २६०॥
ऐसे जरी हें नसतें । तरी जारप्रेम म्हणों येतें । जारजरिणीचें नातें । अंगी जडतें तात्काळ ॥२६१॥
परी तैसें हें नव्हे कांही । जार जारिणी दोन्ही नाहीं । आपणचि आपुल्या ठायीं । निर्विकल्प स्वरूपें ॥२६२॥
भेद सर्व अज्ञानमूलक । ठायीचं हरपला नि:शेख । भोग्य भोक्ता आपणचि एक । निश्चय दृढ जाहला ॥२६३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP