मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ३३ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३३ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ तस्मास्तैव ग्राह्या मुमुक्षुभि: ॥३३॥ Translation - भाषांतर आतां मुमुक्ष तो कोण । ज्यासी मोक्षाचीच लागली तहान । इतर इच्छा गौण । कार्याकारण रहिल्या ॥३२०॥मोक्षाचीच तीव्र कांक्षा । त्याच नांव मुमुक्षा । क्वचित कोठें येईल लक्षा । जरी भाषा बोलतां सुलभ ॥३२१॥मोक्ष तरी काशास म्हणावें । तेंही लागे धुंडाळावे । शब्दाचें अवघड गोवे । उकलितां कठिण ॥३२२॥कोणी म्हणती मोक्षाचि नाहीं । मोक्षाची ते चाड नाहीं । बहुतेक विषयांचे डोही । राहिले पडोनि नि:शंक ॥३२३॥विषय भोगितां दु:ख होय । तेवढें सर्वांसी अप्रिय । दु:खविरहित विषयांची सोय । हीच आवडी सकळिकां ॥३२४॥परि हें कदापि न घडे । विषय भोगितां दु:खावर पडे । अनिच्छयाही होणें घडे । ठाऊके आहे सर्वांसी ॥३२५॥भोगापाठीं दु:ख । जडलें असे आवश्यक । दु:ख विरहित भोगसुख । न दिसे न ये अनुभवा ॥३२६॥दु:खाची आत्यंतिक निवृत्ति । आणि निरतिशयानंदावाप्ति । हेचि एक मोक्षस्थिती ग्रंथातरी वर्णिली ॥३२७॥हें जरी नये अनुभवा । तरी सर्वाशीच तयाचा हेवा । जाणत अजाणतपणें जीवा । तेंच व्हावें निश्चयेसीं ॥३२८॥यालागीं जग सर्व मोक्षाकांक्षी । असोनि उपायातें कोणी न लक्षी । नारद बोलिले ते पक्षी । हितार्थ मानवजातीच्या ॥३२९॥जयासि मोक्षचि व्हावा । तो मुमुक्षु ऐसा जाणावा । तेणें भक्तीचा मार्ग धरावा । तेणेचिं कार्य साधेल ॥३३०॥भक्ति प्रिय ईश्वरासी । तो तंव सुखाचीच राशी । शाश्वत सुख देऊनि सर्वासी । दु:खसंकट निवारी ॥३३१॥म्हणोनि सर्वाशीं ग्राह्यभक्ति । भक्तिनें लाभेल मुक्ति । तयालागीं साधन व्युत्पत्ति । तेचि पुढें बोलिली ॥३३२॥ N/A References : N/A Last Updated : November 16, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP