मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ६ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति ॥६॥ Translation - भाषांतर भक्तीचा कैफ दारुण । समूळ उडवी देहाभिमान । प्रपंचभ्रांति निरसून । उन्मत्त करी साधका ॥१०७॥मादकद्रव्यें सेवून । उन्मत्त होताती जन । परि ते होऊनि विषयाधीन । घात आपला करिताती ॥१०८॥तैसी भक्ति नव्हे जाण । कांहीं सेवावें न लागून । साधकांचे मन वेधून । लावीं अखंड हरिचरणीं ॥१०९॥चरणांचा महिमा अगाध । अंतरी उपजे स्वरूपबोध । बोधासवें परमानंद । प्रकटोनि करी उन्मत्त ॥११०॥हे तो ज्ञानाची उन्मत्तता । सहज नये कोणाचि ये हातां । परि जयासी लाभे तत्वतां । तो उठे संसारामधूनि ॥१११॥कोणाचा पुत्र कोणाचा मित्र । कोण तात कोण मातृ । सखे संबंधी सर्वत्र । हरिरूप एकत्वें ॥११२॥हरिप्रेम संचरे अंतरीं । नाहीं देहभानाची उरीं । आपण यासकट चराचरीं । सर्वत्र देखे हरी भरला ॥११३॥हरीसाच बोले चाले । हरीसमवेत निजे खेळे । सर्व व्यवहार करितां वेगळे । नव्हे कदापि एकला ॥११४॥ N/A References : N/A Last Updated : November 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP