मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १५

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १५

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


आतां या भक्तीची लक्षणें । सांगो म्हणति सावध मनें । मतमंतरांची व्याख्यानें । ऐकोनि ध्यानीं आणावीं ॥२०१॥
लक्षणांचें मुख्य लक्षण । वस्तूंचें करावें दिग्दर्शन । अनुमानासि व्हावें साधन । तरीच लक्षण बोलिजे ॥२०२॥
तयासिं नाहीं नित्यता । अनुमानापुरती साध्यता । सर्व काळ पाहो जातां । वंचकत्व येई तयासि ॥२०३॥
शाळेंतील पंतोजी । छडी सदा हातामाजी । छडी टाकोनि घेतां भाजी । काय आपणांसी मुकेल ॥२०४॥
शाळेमाजी पाहिला । तेणें छडीसहित वर्णिला । मंडईमाजी अवलोकिला । म्हणे भाजीवाला पंतोजी ॥२०५॥
पंतोजी दोहींवेगळा । परि अपरिचितासि दावावया भला । उपयोग करावा लागला । भाजी छडी लक्षणांचा ॥२०६॥
छडी घेतली पोरानें । तरी तो पंतोजी नव्हे त्यानें । भाजी घेतली पंतोजीनें । तरी तो नव्हे भाजीविक्या ॥२०७॥
लक्षण पाहिजे अव्यभिचारी । तरीच तगेल निर्धारीं । कधिं असे न दिसे तरी । वाया सूचकत्व तयाचें ॥२०८॥
परि जयांसी जें दिसों आलें । तैसेचि तयानें वर्णिलें । लक्षण म्हणोनि संबोधिलें । तरी तेहीं जाणिलें पहिजे ॥२०९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP