माधव जूलियन - सुप्रभात !
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति दोहा]
मुम्बऊमधे पहाल तो
आपुल्याच घाऊंत.
क्वचितच शेजार्याचेंही
असे नाव माहीत १
दिल्यावीण परिचय करुनी
पुसे कुणी न कुणास;
शिकलेले बैठकीमधे
बसती मूक ऊदास. २
माणुसघाणा हा कुठला
मुलांस शिष्ठाचार ?
हसुनि हसविती विश्वासें
फुलांपरी साचार. ३
असा ऊकदा जातांना
थबके मी रस्त्यांत
पाहुनि ऊका पोरीने
केला पुढती हात. ४
कन्या दिसली धनिकाची
खेळकर स्नेहाळ;
क्षेत्र गमे सौभाग्याचें
ऊसें विलसे भाळ. ५
गुलाबापरी कान्ति तिची
अन सोनेरी केस;
वेषहि हलका फुगीर तो
जलावरिल जणु फेस. ६
सुरगाडीवरती ऊजवा.
डावा खाली पाय;
करुनि हसतमुख वरी पुसे
मूकपणें जणु ‘काय ?’ ७
विश्वासी कौतुकच्छटा
नील लोचनी रम्य;
दूर पळे पाहतां तिला
जगांतील वैषम्य. ८
स्वीकारील न कोण बरें
अशा मुलीचा हात ?
स्पर्शिल गाल न अङगुलिने
वात्सल्यें वाहात ? ९
‘सुप्रभात’ ! मी जों वदलों
तीहि वदे तो बोल;
अन सुरगाडीवर निसटे
सहज सावरित तोल. १०
गुदमरत्ता हृदयास मिळे
जणू सकाळ - झुळूक;
तळमळत्या हृदयाची ती
क्षणांत शमवी भूक. ११
१३ ऑगस्ट १९३४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP