मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
केवढा अन्याय !

माधव जूलियन - केवढा अन्याय !

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द]

प्रेम तुला कळविलें
माझा केवढा अन्याय !
तुझे अन्तरले पाय. १

स्तुति काव्यदेवतेची
गातां ललित रागांत
झाला भलताच घात. २

तुझ्या लावण्याला जणू
कवनाचा लागे डाग,
म्हणून काआला राग ? ३

तुला भाबडया भक्तीचा
बोल अवघड वाटे -
स्त्रीचें मन औफराटें ! ४

भय प्रेमाचें वाटतें ?
वर कशास तू आन,
होवो तुला समाधान. ५

नाही समाधान मला,
नको नको असें यश
न करी जें तुला वश ! ६

मिश्र धातूचें शिक्क्याचें
नाणें खणाखण वाजे,
होती त्याने जगीं काजें, ७

नाही चलन तें माझ्या
दरिद्याच्या भाण्डारांत,
दीस म्हणून हो रात. ८

आलों औपेक्षाव्यथित
हळू हळू दूर दूर -
शमेनाच हुरहूर. ९

कळवळून दुरून
घालतां मी तुला साद,
अरण्य दे पडसाद. १०

मज काळ्याभोर छाया
वेढितात बाहुपावाशीं
राही हृदय औपाशी, ११

वेङघ तोडाया तयांची
जीव कसा करी नेट,
जाया औषेकडे थेट ! १२

ता. १ जुलै १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP