माधव जूलियन - उठा रे !
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द परिलीना]
ऐठा रे ! चुलीशी का अशी दाटी ?
न्हाणींत जा निघा आङघोळीसाठी
घाऐ गे कशाची आदित्यवारीं ?
थण्डीचा कडाका पडला भारी
हें पण सर्पण वाया जळतें
अङघोळीने थण्डी चट पळते
खाऊन फुगीर आरोळी पोपी
अङगांत चढवा डगला टोपी
म्हणतें कुठे मी, घ्या बूक पाटी ?
जा खेळा, न करा चुलीशी दाटी,
कोवळें धुकट सोनेरी औन
बोलावी तुम्हांला करून खूण
पोपटी गवतीं पडून दंव
पाण्ढुर पाण्ढुर ये रङग नव
बाहूं द्या पूर्वेचा चावरा वारा
खेळाच्या औबेचा तडाका न्यारा
धुक्याची धाबळी वेढून दूर
डोङगर आजोबा घ्यानांत चूर
खेळूं द्या मोकळा मुलांचा ताफा
नाकाने तोण्डाने निघूं द्या वाफा !
ता. २८ नोवेम्बर १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP