माधव जूलियन - कलारहस्य
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति मुद्रिका]
“कल्पना तरल किति ! ललित नादमाधुरी,
भूमिका औदात्त अहा ही
अप्रतिम कलाचातुरी ! १
कवि कोण ? गूढ तच्चरित कळूं द्या जरा,
अन कोण अहो व्यक्ती जी
वाहवी स्फूर्तिचा झरा ?” २
कवि कुणी असो, तो मला वाटतो सखा,
फाडुनी हृदय बघण्याचा
पाहिजे क्रूर सोस कां ? ३
पडसाद गोड कविगीत औमटवी हृदीं,
जवळीक ऐपजवी न्यारी
जशि कुमुदमनीं कौमुदी. ४
औद्दिष्ट असो ती कुणि पार्थिव अङगना,
रञ्जवी अधिक तिजहूनी
मम हृदयीं ही व्यञ्जना, ५
आदर्शभूत ती तया, मला कासया ?
ह्रत्तरलतरङगीं माझ्या
ही शोभे पद्यालया. ६
रेखीव अमुक ती असो कुणी कामिनी,
ही शाश्वत मम हृदयींची
मोहिनी कामरूपिणी, ७
हृत्पटावरिल भरकामचित्र टाकुनी
बघण्याला मागिला टाके
ठाकेल रसिक का कुणी ? ८
ता. १० सष्टेंम्बर १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP