माधव जूलियन - निर्झरास
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द देवीवर ]
बाळ ! खळाळत जाशी,
तुझा खेळकर ध्वनी
स्निग्ध घुमे माझ्या मनीं. १
ऊषा करिते पाहून
तुझें रञ्जन समोर
होऊ ह्रदय हें थोर. २
तुझ्या हास्यांत चमके
सार्या विश्वाचें चैतन्य -
धन्य माझे डोळे धन्य ! ३
तुझ्या मुखींच्या दर्पणीं
बघतां मी माझें मुख
वाटे अथाङग कौतुक. ४
बाळ, तुझ्या रे वाचून
कळणार तरी कुणा
भग्न अन्तरींच्या खुणा ? ५
म्हणो पाषाण ह्रदय
कोणी घालो हृदीं घाव.
घेतला तू माझा ठाव. ६
भाव कित्येक वर्षाचे
साचलेले राजसा रे,
घेऊ तूच आज सारे ! ७
माझ्या जीविताच्या आशा
तुझ्या मध्येच सकल
आता व्हायच्या सफल ८
द्दष्टि पुढेच तुझी ही,
इजानन्द - लहरींत
जाशी दुरी गात गीत. ९
ऊरीं आडवूं कशाला ?
तुझा प्रवाह हा गोड
जावो जेथे जेथे ओढ. १०
तुला वाटेने भेटोत
सान थोर नवे स्नेही.
भेटी सुखें घेऊं देऊं. ११
पृथ्वी विपुल पहा ही,
धाव कुठेहि जा स्वैर,
सृष्टि फुलव चौफेर. १२
कर पराक्रम मोठा
पुढे सहस्र हातांनी
वसवुनी पुरें रानीं. १३
लोकीं तुझिया नावा
होतां मोठा गाजावाजा
शोध निघेलच माझा. १४
मग अज्ञात हें नाव
फैलावेल जगामधी
दूर ऊकेल जलधी. १५
ता. १२ मार्च १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP