माधव जूलियन - भातुलीचें गाणें
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द अचलगति]
पाहुं तुझें तान्हुलें
घरकूल सानुलें
कोपर्यांत अन्धांर
त्यांत तुझा संसार
चिमुकला चाङगला
पाटाआड माण्डला
ठाकठीक रहाणी
पोर माझी शहाणी
बाहुलीचें लगीन
सजली ही विहीण
खण घ्या हे तिकोनी
रूसूं नका हो कोणी
लाहया पोहे खाऔस
पक्वान्नांचा पाऊस
हवें तें घ्या या काळीं
द्रौपदीची ही थाळी
बाळ माझी रमली
वाढतांना दमली
ताम्बूस ही गालाची
गुरोळी ग कोणाची ?
ता. २६ ऑगस्ट १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP