मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
पाहुं कुठे तुज राया ?

माधव जूलियन - पाहुं कुठे तुज राया ?

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति साकी]

पाहुं, कुठे तुज राया कनया, पाहुं कुठे तुज राया ? ध्रु०
मोहरुणी सहकार चहुकडे घमघमती या राया १
शीळ मात्र तव कुठुनि तरी ती परिचित ये ऐकाया २
कोकिळ न दिसे, साद परि पिसें लावी तशि तव माया ३
जवळ बोलवुनि जाशी फसवुनि: कठिणच तव लीला या ४
प्रीति तुला ही मानसचन्द्रा, बिलगुं बघे पण वाया ! ५
मी तव छाया सुकप्रकाशीं बसुं दे मज तव पायां. ६

ता. १५ ऑक्टोबर १९२६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP