मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
जा स्वतन्त्रतेची मौज चाख !

माधव जूलियन - जा स्वतन्त्रतेची मौज चाख !

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति श्यामाराणी]

जा. स्वतन्त्रतेची मौज चाख !
कां, तुला कुणाचा आज धाक ? ध्रु०

मोहरला सहकार तुझ्यास्तव,
पहा शिरीषीं नूतन पल्लव,
गाजवील पिक अता मधूत्सव, अनुरागाची ऊक हाक ! १

पञ्चरींच तुज चारा घालूं
अन सुखशब्दीं मी कुरवाळूं,
गमेन मग म्हणजेच दयाळू कातरुनिहि तव मऊ पांख ? २

छे ! प्रेम हवें मुक्त मनाचें,
रक्त नसांमधुनी जंव नाचे,
बन्धनीं जरी प्रथम रसाचें सार मानिती लोक लाख. ३

गारठल्या या हृदयीं माझ्या
ऊब ऊरे ती तुझीच राजा !
फीर ! सवंगडी योग्य पहा जा ! पडख सुरक्षित मुक्त राख ! ४

ता. २० एप्रिल १९२९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP