मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
मुलांचा साडूगाती

माधव जूलियन - मुलांचा साडूगाती

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[अभङग]

दुक्ख कधी तुला
होतें का प्रभो रे,
हट्टी तुझीं पोरें
पाहुनीया ? १

हट्टाने अज्ञानें
सोडूनी ती वाट
धावती सैराट
नादावून. २

कुठे काटा बोचे,
कुठे जळे बोट,
कुठे कडेलोट
तोही होऐ. ३

सारीं अल्पमती
नसे दूर - द्दष्टि
भव्य किती ! ४

रडत हासत
जाती बाळें दुरीं,
प्रभो, तुझ्या औरीं,
शान्ति केवी ? ५

नियमाचें राज्य
तुवां चालू केलें,
स्वातन्त्र्य का गेलें
त्वदिच्छेचें? ६

केवी म्हणे तुका,
तू माझा साङगाती
चालविशी हातीं
धरूनिया. ७

ता. १५ सप्टेम्बर १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP