मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
माझ्या व्याकुळतां जीव

माधव जूलियन - माझ्या व्याकुळतां जीव

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[अभङग]

माझा व्याकुळतां जीव
घेतों तुझ्याकडे धाव
घाव लागतां हृदयीं
येऐ ओठीं ‘आशी ! आऐ !’
ऐकाकी मी हाय हाय !
वाटे जगीं असहाय.
सरे जग दूर दूर
भरे तुझ्या प्रेमें और
मागूं तुझ्यापाशी काय
न कळे हें देवराय !
श्रेय माझें कशामाजी
तूच जाणशी देवाजी
राहो निकोप शरीर
राहो मनीं शान्ति धीर
घडो तुझ्यासाठी देवा
तुझ्या प्रपञ्चाची सेवा
पटो सदैव जीवास
असशी तू आसपास.

ता. २६ ऑगस्ट १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP