मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
लेजीम

माधव जूलियन - लेजीम

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति भुवनसुन्दर]

चला रे खेळूं लेझीम
म्हणा या जयजय बलभीम !
सम्पलें दिससाचें काम
सान्ज पुरतो आराम
सुगीचे त्यांतुनि हे दीस,
कशाची तोड न शेतीस
हरभर शाळूचा हुरडा
मधूनी नित्याचा तुकडा
रसाने औसहि भरलेला
चालतो भूकतहानेला
गुळाचा खमङग हा बास
दरवळे खुलवित जीवास
अङगीं भर तारुण्याचा
कुणाला हिशेब कष्टांचा ?

काम्बळीवरती म्हातारे
विसावा घेऔं देत सारे
आपण परी बालभीम
खळाखळ खेळूं लेजीम
वाजतो धुडुम धुडुम ढोल
गडयांनो औठा धरा गोल
फुरफुरे ढणाढणा पोत
दाखवी वार्‍याचा झोत
चान्दण्या पहातात मौज
कष्ट ते आहेतच रोज
पाहते पाण्ढर पोशाखी
खेळते काळी, धौशा की !
धरा र फेर कठिण बाका
पाऔलें तालावर टाका
खळाखळ लेजिम बाजूं द्या
औभें हे शिवार गाजूं द्या
सरका औठा बसा खाली
मागे पुढे भोवताली
खळाळुनि लेजिम फेरांत
दुमदुमे आनन्दे रात
स्फूर्तिचे ऐका रे बोल
वाजे धुडुम धुडुम ढोल
चालुं द्या ऐक धुमश्चक्री
चढूं द्या घोषें वीरश्री
दाखवा पायीं चपळाऐ
होऔं द्या खूप हातघाऐ
चालला घाऐचा ताल
चालला धुन्दींतच काळ
धुळोरा औडला पायांनी
औजेडीं पाण्ढुरतो रानीं
लागती घामाच्या धारा
रानचा वरी गार वारा
जोम पण मराठबाण्याचा
मावळी जिवन्त पाण्याचा
खळाखळ वाजे लेजीम
दुमदुमे जयजय बलभीम

ता. ८ ऐप्रिल १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP