माधव जूलियन - अभिसारिका
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
नवतिच्या बहरामधि बालिका
करूनी साज तर्हेचा निका
चालली लगबगा कोठे अभिसारिका ? १
कोणता राजहंस मानसीं
हुरहुरे ज्यास बघाया अशी ?
किती डौलदार चापल्य हें तिच्या नसीं ! २
चोळी अङगामधि जरतारी,
पातळ निळें खडीचें भारी,
सन्ध्येची लाली तनुमन रङगविणारी. ३
पुढे तिज ओढी रम्यायती,
वायुच्या लहरीपरि जाय ती,
थबकती बधुनि तिज हरिणें, गति काय ती ! ४
भागुनी विकल होय तनुलता,
स्त्रीची कुसुमासम मृदुलता.
लागतां द्दष्टि कोमेजे फुलतां फुलतां. ५
तोंच ये वंशततींतुनि शीळ
औल्लसितहो युवती श्रमशील,
मनिं म्हणे, ‘श्यामला. जवळच तू असशील.’ ६
जिबाला अतर्क्य ती लागणी,
मनाची तनूपुढे धावणी,
भेटला काय तिज कुठे जिवाचा धनी ? ७
दिसे तिज कोणाची साऔली ?
लागती कोणाच्या चाहुली ?
ती क्षितिजीं भासे जणु छायाबाहुली. ८
ऐशी गूढरागरङगेली
नादें दूर कडेला गेली;
पडली का ? न दिसे, का कुणि तिजला झेली ? ९
‘भेटी जिवाशिवांची घडली,
अवघी संसृतिचिन्ता झडली,
हा स्वर्भूसङगम !’ सन्ध्या अस्फुट वदली. १०
ता. २८ जानेवारी १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP