माधव जूलियन - बघें प्रथम मी बालवयीं
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति दोहा]
बघें प्रथम मी बालवयीं
पोर सतेज शुशील,
जणू ऊजळती ऊषाच वा
हिम मधुमासांतील १
दिवसभर तिचे खेळगडी
गुलाब अन गुल्बास;
तिच्यामधे त्यांचाच दिसे
मुग्ध तरल ऊल्लास. २
मग ती अठरा वर्षांची
दिसली बाला गौर,
मनोविकासें रूपभरें
चमके काही और ! ३
चन्द्रिकाच ती कान्ति तिची,
सङगीतच ऊदगार !
विफलाशा बहुतांची ती,
ऊकाचें सुख - सार ! ४
बहु वर्षांनी ठेवीं मी
तिच्याजवळ पाऊल -
फूल कळीचें झालेलें.
दिसे स - फल तें फूल. ५
पोक्त माय ती अता दिसे.
धरी ऊरीं निज बाळू,
पूर्वींहूनहि सुन्दर ती
मला गमे तत्काळ. ६
पुन्हा ऊकदा मी पाहीं
अन्तदिनीं तें तीस.
दिव्य द्युतिमण्डल भवती.
समीप राहे ऊश. ७
न वासनांचा ताप तदा
लवहि न भीति - विमर्श, -
दिसला मज तेव्हाच तिचा
तो सौन्दर्योत्कर्ष ! ८
२२ ऑगस्ट १९३४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP