माधव जूलियन - वृद्ध कवि
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति मुद्रिका]
कां उठतां ? खाली बसा तरुण मण्डळी.
औपचार ठेवितां कां हा ?
समताच योग्य या स्थळीं. १
लोचनांत आदर दिसे न हा थोडका,
स्तुतिहून नसे स्नेहाची
ही शान्त नजर गोड का ? २
म्हणण्याचा आग्रह नको, अहो वृद्ध मी;
नव कवनें ऐकायाची
परि हौस न झाली कमी. ३
झोपली थकुनि अन्तरीं स्फूर्तिनन्दिनी,
जाहला पराक्रम मागे
जरि थोर आमुच्या दिनीं, ४
बदलली सृष्टि, सम्पले दिवस आमुचे,
ही समुद्धारिणि क्रान्ती
चालली प्रभूली रुचे. ५
मी झालों पिकलें पान आणखी तुम्ही
टवटवीत सुमनें नामी
काव्याच्या कल्पद्रुमीं. ६
वा क्षितिजीं तारे तुम्ही नवोदित पहा,
चालला लयाला माझा
क्षीणांशु काव्यदीप हा. ७
वा भाट औषेचे तुम्ही, गीत गा नवें.
- क्रन्तिचें पुढील तुम्हांला
सौन्दर्य दिसे, वानवें. ८
मज तुमचें आशागीत आज ऐकुं द्या,
नसणार कदाचित येथे
मी औषा पहाया औद्या. ९
अन्धार कुन्द देवळांतुनी आमुच्या,
कां पुराण ऐका गातां
कवि मोकळिकीच्या ऋचा ? १०
ही जडता जडुं पाहते, न ही परिणती;
वर्धिष्णु बाल्य मज लाभे
तुमच्याच पुन्हा सङगती. ११
शारदा. दिव्य माऔली थोर आपुली,
अन बाळें आपण सारीं
सोनुलीं तिचीं सानुलीं. १२
नाचलों खेळलों पुरा, अता भागलों.
मी माण्डीवर आऐच्या
हा पहुडाया चाललों. १३
परि दिन हा तुमचा, औठा बागडा तुम्ही !
तुमच्याच गोड खेळांचें
पाहिन स्वप्न चारु मी. १४
ता. ५ सष्टेम्बर १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP