माधव जूलियन - पोचवणूक
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[अभङग]
घरीं बैसतां का वाया ?
चला बाहेर हिण्डाया
खुल्या माळाला बाहेर
वारें चैतन्यमाहेर
सेवूं पश्चिमझुळूक
गाऊं ऐजेडीं अन्धुक
चला करूं या बेडर
वाद प्रिय कलेवर -
कलेवर तोंच ऐक
येऐ समोरून देख.
कोणी म्हणे, “या साङगाती
आटपले सारस्वती.”
किती धन्दे ! काय ऐट !
अन्तीं हीच वाट थेट.
फक्त पञ्चवीस जण
घेती अन्तींचे दर्शन
रूक्ष वाळूगोटयांवरी
थाम्बे कुडी नदीतीरीं !
नदीजळ झुळझूळ
हो न थोडेंडी गढूळ
शेण्यालाकडांच्यासाठी
का हो सार्या खटपटी ?
धुन्दी डोळां, नसीं रग
तृणापरी तेव्हा जग
देह जळे तृणापरी
और सारस्वत परी
प्रभो, कठिण समयीं
धरी सेवक हृदयीं ! २
होतां माझी हीच गती
कोण येऐल सङगती !
माझे कौतुकाचे बोल
शारदे, हे सारे फोल.
तुझा साधाया प्रसाद
देवी, केवी घालूं साद ?
ज्ञान माझें हें ऐकीव,
जाणशी तू कर कीव.
वेडेंवाकुडें मी गातों
आणि तुझा म्हणवितों
कीर्तीची ही कावकाव
करी कर्णमूळीं घाव.
कोकिळाची आळवणी
याया हवी ती लागणी. ३
ता. १५ सप्टेंम्बर १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP