माधव जूलियन - अङगाऐ
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द]
कुणा नाही बघवलें
बाळ लुटुलुटू चाले
पडलें ग - काय झालें ? १
कुठे लागलें नाही ना
चिमुकल्यास या माझ्या ?
औगी औगी माझ्या राजा. २
पहा औन्दिर पळाला,
देऔं त्याला असा मार
झाला खोडकर फार. ३
औगी ! कोण पाडसाला
माझ्या बोललें रागाने ?
शहाणें गे माझें तान्हें ! ४
औद्या दुपारीं बान्धू हं
त्याचें औन्हामध्ये घर,
बाळ माझें खेळकर ! ५
केलें अङगुलें मङगुलें
तीट लाविली बाळास.
द्दष्ट गेली, गडे हास. ६
चल बाहेर कसा तू,
बघ चान्दण्या हासती,
बाळ, तुला खुणाविती, ७
बाळ, खेळून खेळून
आता येशी झोपायला,
वर चान्दोबा भागला, ८
चान्द निम्बोणीच्या झाडा -
मागे निजायला गेला.
पाङघरून काळा शेला. ९
बाळ माझ्या ग पदरा -
खाली निजे माण्डीवर
रत्न माझें मनोहर ! १०
काम राहिलें तुझ्याशी
खेळण्यांत नाना खेळ,
यायची ती झाली वेळ. ११
बाळ, आहें मी येथेच,
औठूं नको, कर गाऐ -
सोनें कसें झोपीं जाऐ ! १२
ता. ८ सप्टेंम्बर १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP