मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
सेवा - धर्म

माधव जूलियन - सेवा - धर्म

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति मुद्रिका]

हें धनावलम्बन बघुनि जीव हा गळे.
मी बाणा स्वातन्त्र्याचा १

दिडकीसहि किति लागती अर्ज - आर्जवें !
भागे न कष्टकामानें
आणखी स्वभावार्जवें. २

निढळाच्या घामें मिळे सुका चौत हा,
ऊपकार गणावा लागे
हा न्याय धन्याचा पहा ! ३

कष्टांची चिन्ता नसे; तपस्याच ही !
पण ऊक तपें खितपें, तों
दुसराच भोगितो मही. ४

जाणूनि नेणतें परी व्हायला हवें.
भूपरी तप्त रस पोटीं
पचवाच जरि न साहवे. ५

माझेच हात पण त्यांस वळवितां धनी
खपुं कैसा पोटासाठी
मी नरकाच्या साधनीं ? ६

गेलाच आजचा दिवस, ऊद्याचा पुढे,
हें निर्शीं परी न विसावे
कष्टलें हृदय बापुडें. ७

बाहेर चान्दणें पडे दुधासारखें,
परि भरेल का बाळाचें
पोट या दुधाने सखे ? ८

वाटतें नको हें पोट, नको हें जिणें !
ही पापभीरुता जाची
पैक्याच्या छत्राविणें ! ९

ता. ६ फेब्रुवारी १९३३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP